Wardha: विनाकारण साखळी ओढणे पडले महागात; नऊ महिन्यांत १०५ प्रकरण दाखल

विनाकारण साखळी ओढणे पडले महागात; नऊ महिन्यांत १०५ प्रकरण दाखल
Railway
RailwaySaam tv
Published On

चेतन व्यास

वर्धा : धावत्या रेल्वेची काही कारण नसताना साखळी ओढून थांबविले जाते. यामुळे रेल्वे व प्रवाशांचा देखील खोळंबा होत असतो. रेल्वेकडून याबाबत सूचना असतानाही अनेकजण साखळी ओढत असतात. नऊ महिण्यात वर्धेत अश्या १०५ जणांवर (Railway) रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. इतकेच नाही तर ९५ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ८४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई (Wardha) रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक रामसिंग मीना यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Wardha Railway News)

Railway
Jalgaon: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वासरांचा मृत्यू

रेल्वे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही अनेक प्रवासी कुठलेही कारण नसताना विनाकारण रेल्वेतील साखळी ओढत असतात. प्रामुख्याने एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसलेल्या गावांच्या ठिकाणी साखळी ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यावर अंकुश घालण्यासाठी (Wardha Railway Station) वर्धा स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून कारवाईचा बडगा उगारल्या जातो आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनाकारण साखळी ओढल्यास दंडात्मक कारवाईसह अटकही होवू शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

८४ हजाराचा दंड वसूल

विनाकारण रेल्वे गाडीत साखळी ओढून रेल्वे थांबविण्यारांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड व अटकेची कारवाई केल्या जात असल्याची माहिती आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या नऊ महिन्याच्या कालावधीत तब्बल १०५ प्रकरणं दाखल करण्यात आली. यातील ९५ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com