Jalgaon: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वासरांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वासरांचा मृत्यू
Leopard
LeopardSaam tv

जळगाव : जवखेडे सीम (ता. एरंडोल) येथील शेतकऱ्याच्या पाच वासरांवर बिबट्याने (Leopard) हल्ला केल्याची घटना घडली. त्यात पाचही वासरांचा मृत्यू झाला. नागरिकांनी एरंडोल वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत पशुधनाचा पंचनामा केला. (Jalgaon News Leopard Attack)

Leopard
Nandurbar: २०६ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी १२६१ अर्ज दाखल

शिरसोली, माहेजी (ता. पाचोरा), तरवाडे (ता. पारोळा), एरंडोल तालुक्यानजीक पद्मालय, नागदुली परिसरात वन परिक्षेत्र आहे. परिसरात हिंस्र श्वापदांचा संचार आहे. एरंडोल तालुक्यातील जवखेडेसीम येथील रहिवासी (Farmer) शेतकरी संजय कैलास पाटील यांची गावाजवळ शेती आहे. संजय पाटील मंगळवारी सकाळी गावालगत शेतात जनावरांना चारापाणी व दूध काढण्यासाठी गेले असता पाच वासरांचा हिंस्र प्राण्याने फडशा पाडल्याचे लक्षात आले. या पशुधनासोबत बाजूलाच संजय पाटील यांचे बैलजोडीसह अन्य पाळीव पशुधन होते.

शेतात आढळले पावलाचे ठसे

जवखेडेसीम येथील शेतकरी संजय पाटील यांचे पशुधन गावालगतच असलेल्या शेतात रस्त्याच्या कडेलाच बांधलेले होते. बिबट्याच्या हल्ल्यात दोन ते तीनवर्षीय पाच वासरांचा मृत्यू झाला. जवळच असलेल्या कपाशीच्या शेतात हिंस्र प्राण्याच्या पावलाचे ठसे आढळले असून, पाच वासरांपैकी एकाचा पाठीमागून लचका तोडला आहे. माहिती मिळताच वनरक्षक विजय माळी यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे (एरंडोल) यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com