Nandurbar: २०६ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी १२६१ अर्ज दाखल

२०६ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी १२६१ अर्ज दाखल
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam tv
Published On

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ४५, अक्राणी तालुक्यातील २५, तळोदा ५५ व नवापूर ८१ अशा एकुण २०६ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) सार्वत्रिक निवडणूक आहे. यासाठी नामांकन दाखल करण्याच्‍या अखेरच्‍या दिवशी तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून (Nandurbar) मोठी गर्दी पाहायला मिळाली. २०६ ग्रामपंचायतींसाठी १ हजार २६१ अर्ज दाखल झाले आहेत. (Nandurbar Gram Panchayat Election)

Gram Panchayat Election
Malegoan : दाेघांच्या वादात मेव्हण्यावर हल्ला; निहाल नगर भागात गाेळीबार ?

राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित परिपत्रकानुसार सदर निवडणुकातील मतदान व मतमोजणीची तारीखेत बदल करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक (Election News) २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्रे भरण्याची तारीख असून २८ सप्टेंबर नामनिर्देशन पत्र छाननी तर ३० सप्टेंबर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार १६ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडून १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

नवापूर (Navapur) तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या असून नामनिर्देशनपत्र पत्र दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी थेट सरपंच पदासाठी ५३२ नामनिर्देशन दाखल करण्यात आले. तर सदस्य पदासाठी २०३७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी १२५ तर सदस्य पदासाठी ४०० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.

तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून इच्छुक उमेदवारांकडून अखेरच्या दिवशी सदस्य पदासाठी १२०८ तर सरपंच पदासाठी २८२ नामांकन दाखल करण्यात आली आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून अखेरच्या दिवशी पर्यंत सरपंच पदासाठी ३२२ व सदस्य पदासाठी १४०५ नामांकन दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन मस्के यांनी दिली आहे.

सदस्‍य पदासाठी ५ हजार ५० अर्ज

नंदुरबार जिल्ह्यातल्या 206 ग्रामपंचायतीच्या आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी भाऊ गर्दी केली होती. आज जिल्ह्यातील 206 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी 1261 तर सदस्य पदासाठी 5050 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com