Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि आयुष्यात योग्य मार्ग दाखवणारे गुरु मानले जातात. लोक मोठ्या संख्येने यांचे विचार फॉलो करतात.
चाणक्य म्हणतात, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कधीही जास्त बोलण्याची चूक करू नका. याने अडचणी वाढतील. नाही बोललात तर भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल.
कामाच्या ठिकाणचे यश फक्त तुमच्या परिश्रमावर अवलंबून नसतं. उलट, ते योग्य वेळी बोलण्याच्या आणि शांत राहण्याच्या कलेवर असतं.
चाणक्य म्हणतात, तुम्ही ज्या ठिकाणी जास्त बोलता तिथे तुमचं महत्व कमी होतं. पण योग्य वेळी बोलल्यामुळे तुमचं महत्व वाढतं. पुढे आपण याबद्दल ५ गोष्टी जाणून घेणार आहोत.
चाणक्यांच्या मते कामाच्या ठिकाणी त्या संस्थेबद्दल जास्त आदराने बोला. तिथे कोणतेही नुकसान होईल असे वागू नये.
कामाच्या ठिकाणी प्रत्येक वादात सहभागी होणं किंवा प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडणं हे शहाणपण नसतं.
चाणक्य म्हणतात, एखाद्या व्यक्ती कसा आहे हे ओळखण्यासाठी त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृती आणि वर्तनावर लक्षकेंद्रीत केलं जातं.
चाणक्यांच्या मते, वरिष्ठांशी किंवा निर्णय घेणाऱ्या पदांवर असलेल्यांशी बोलताना भाषेची आणि आवाजाची विशेष काळजी घेतली पाहिजे.
चाणक्य नितीनुसार मौन हाच तुमच्या यशाचा मार्ग आहे. म्हणून योग्य वेळी बोलायला शिका आणि गप्प राहायलाही शिका.