Health news: कान,डोळ्यातून रक्तस्राव आणि..., 17 देशांमध्ये पसरलाय धोकादायक Virus

Health news: नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, हा व्हायरस १७ देशांमध्ये पसरला असून त्याचा प्रादूर्भाव अधिक आहे.
virus
virussaam tv
Published On

जर तुम्ही परदेशात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही बाहेरच्या देशात प्रवास करत असाल तर सावधान व्हा, याचं कारण म्हणजे एक व्हायरस सध्या मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याची माहिती आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, हा व्हायरस १७ देशांमध्ये पसरला असून त्याचा प्रादूर्भाव अधिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या धोकादायक इन्फेक्शनमुळे मारबर्ग विषाणू या डोळ्यांतून रक्तस्राव होणाऱ्या समस्येचाही समावेश आहे. ही प्राणघातक समस्या केवळ वेगाने पसरत नाही, तर अनेक देशांतील प्रवाशांसाठी धोक्याची घंटा मानली जातेय.

virus
Diabetes Patient: सावधान! डायबिटीजच्या रुग्णांनी लेमन टीसोबत चुकूनही 'या' गोष्टीचे सेवन करू नका, अन्यथा...

डेली मेलच्या बातमीनुसार, तज्ज्ञांनी त्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला ज्या ठिकाणी हा धोकादायक विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू आहे. आफ्रिकन देश रवांडामध्ये आतापर्यंतच्या सर्वात घातक व्हायरसपैकी एक असलेल्या 'मारबर्ग व्हायरस'ने 15 हून अधिक लोकांचा बळी घेतल्याचं समोर आलं आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या व्हायरसमुळे हेमोरेजिक ताप येतो. यामुळे शरीरातील अंतर्गत अवयव आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. अशावेळी डोळे, कान आणि तोंडातून रक्तस्त्राव, ताप आणि थकवा ही त्याची लक्षणे आहेत. या संसर्गाने ग्रस्त लोक विचित्र दिसू लागतात. मारबर्ग व्हायरसवर अजून कोणतीही लस उपलब्ध नाही.

virus
Coffee Mug: ऑफिसमधील कॉफीचा मग तुमच्यासाठी ठरतोय घातक; संशोधानातून धक्कादायक बाबी उघड

ओरोपू विषाणूचा धोका

'स्लॉथ फिव्हर' म्हणून ओळखला जाणारा ओरोपू व्हायरस दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. ब्राझील, बोलिव्हिया, कोलंबिया, क्युबा, इक्वेडोर, डोमिनिकन रिपब्लिक, गयाना, पेरू आणि पनामा या ठिकाणी देखील याची प्रकरणं सापडली आहे.

virus
Psoriasis Disease: हिवाळ्यात त्वचेवर लाल डाग येतात? जाणून घ्या कशी घ्यायची काळजी

परदेशात प्रवास करणाऱ्यांना निर्देश

  • संक्रमित भागांमध्ये गेल्यास पारंपारिक उपचार, अंत्यसंस्कार आणि वन्य प्राण्यांशी संपर्क टाळावा.

  • वटवाघुळांच्या गुहेत जाणं टाळावं.

  • डासांपासून दूर राहण्यासाठी लांब बाह्यांचे कपडे घाला.

  • परदेशात प्रवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याची स्थिती तपासा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com