तुम्ही ऑफिसमध्ये वापरत असलेला मग किंवा घरी वापरत असलेला मग किती सुरक्षित आहे? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही दररोज वापरत असलेला मग तुम्हाला आजारी पाडतोय. संशोधकांना असं आढळून आलंय की, सुमारे 90% ऑफिस कॉफी मगमध्ये विविध प्रकारचे जंतू असतात. एवढेच नाही तर यातील २०% कपवर विष्ठेचे कणही आढळून आल्याचे संशोधनात दिसून आलंय.
शास्त्रज्ञांच्या मते, या बॅक्टेरियाच्या वाढीचं मुख्य कारण स्वयंपाकघरातील स्पंज आहे. जे आपण कमी वेळा स्वच्छ करतो. ज्यावेळी आपण या स्पंजने कॉफी मग पुसतो, तेव्हा कोलिफॉर्म बॅक्टेरिया आणि ई. कोलाईसारखे धोकादायक बॅक्टेरिया मगला चिकटतात, जे तुमच्या आरोग्यासाठी एक मोठी समस्या बनू शकतात.
ॲरिजोना युनिवर्सिटीतील एका अभ्यासात असं आढळून आलंय की, अंदाजे 90% ऑफिस कॉफी मग बॅक्टेरियाने दूषित होतात आणि 20% मध्ये बॅक्टेरियाचे मल ट्रेस झालेत. सार्वजनिक स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे स्पंज हे हानिकारक जीवाणू पसरवण्यात मोठी भूमिका बजावतात, असं या अभ्यासातून दिसून आलंय.
डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिलाय की, ऑफिस किचनमध्ये ठेवलेले स्पंज हे बॅक्टेरियाच्या वाढीसाठी योग्य ठिकाण आहेत. हे स्पंज नियमितपणे बदलले जात नाहीत आणि ते तुमच्या कॉफी मग सारख्या गोष्टींवर सहजपणे जीवाणू पसरवू शकतात. यामुळे आजार पसरण्याची शक्यता खूप जास्त असते.
डॉक्टर फिलिप टिएर्नो यांनी सांगितलं की, आपण सर्वांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. खासकरून तुम्ही हात धुणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपले हात धुत नाही तेव्हा आपले हात घाण होतात, ज्यामध्ये काही जंतू देखील असतात जे आपल्याला आजारी पाडू शकतात. हे जंतू बरेच दिवस जिवंत राहू शकतात आणि जेव्हा आपण काही खातो किंवा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.