Black Tea With Lemon : डॉक्टरांनी दिली धोक्याची घंटा ! वजन कमी करण्यासाठी 'ब्लॅक टी' मध्ये लिंबू पिळताय? किडनीला होऊ शकते नुकसान

Black Tea Side Effects : हल्ली वजन कमी करण्यासाठी अनेक लोक ब्लॅक टीमध्ये लिंबू पिळून तो दिवसभरात कधीही पितात
Black Tea With Lemon
Black Tea With LemonSaam tv
Published On

Black Tea With Vitamin C Can Affect Kidney : अगदी कुणालाही विचारलं की, तुमचं पहिलं प्रेम कोणतं तर तो हमखास सांगेल चहा. अगदी नाक्यावर, ऑफिसच्या बाहेर असणाऱ्या टपरीवर तर सकाळी उठल्याबरोबर आपण हमखास चहाचे घोट घेत असतो.

हल्ली वजन कमी करण्यासाठी अनेक लोक ब्लॅक टीमध्ये लिंबू पिळून तो दिवसभरात कधीही पितात. ब्लॅक टी चं फॅड सध्याच्या तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. लिंबामध्ये क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे आपली त्वचा ग्लो करण्यास मदत होते.

Black Tea With Lemon
Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेला गुरुला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार करा दान, आयुष्यात कधीच येणार नाही अपयश

परंतु, डॉक्टर सांगतात जास्त प्रमाणात दूध (Milk) व साखर (Sugar) घालून चहा प्यायल्याने मधुमेह (Diabetes) व बद्धकोष्ठतेचा धोका वाढतो. म्हणूनच अनेक लोक ब्लॅक टी ला पर्याय म्हणून सुरक्षित मानतात. पण हाच ब्लॅक टी आपल्या किडनीसाठी धोकादायक ठरत आहे.

कोरोनाच्या काळात अनेकांना ब्लॅक टी व लेमन टी पिण्याची सुरुवात केली. अनेक ऑफिसेसमध्ये चहा ऐवजी ग्रीन टी व लेमन टीची सुरुवात केली ज्यामुळे कोरनापासून अनेकांची सुटका तर झालीच पण उच्च रक्तदाब व किडनी स्टोनचा त्रास सुरु झाला. जेव्हा हे रुग्णांच्या किडनीमध्ये स्टोन आढळले तेव्हा त्याची पातळी १० वर होती जिथे ती १ पेक्षा कमी असायला हवे असे केईएम रुग्णालयाचे नेफ्रोलॉजी प्रमुख डॉ. तुकाराम जमाले म्हणाले.

Black Tea With Lemon
Home Remedies For Hair Falls : विंचरताना केस सतत गळतात-तुटतात ? किचनमधील हा आयुर्वेदिक हेअर स्प्रे करेल केस गळतीवर जादू...

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, मुंबईतील एका रहिवाशाच्या पायाला सूज येऊ लागली, त्याशिवाय उलट्या, भूक न लागण्याच्या तक्रारीही समोर आल्या. तपासणीत त्यांची किडनी नीट काम करत नसल्याचे आढळून आले. या व्यक्तीची डाएट हिस्ट्री काढली असता तो ब्लॅक टीमध्ये लिंबू पिळून प्यायल्याचे समोर आले. लिंबू आणि डेकोक्शन पिऊन आपल्या किडनीला हानी पोहोचवणारे अनेक लोक आहेत.

Black Tea With Lemon
Weekly Horoscope : बचके रहेना रे बाबा ! या राशींच्या लव्ह-बर्ड्सना लागेल ग्रहण, तर इच्छुकांचा विवाह जमेल

1. डॉक्टरांनी दिला सर्तकतेचा इशारा

डॉक्टरांनी सांगितले की, जे लोक लिंबाचा रस जास्त प्रमाणात पितात त्यांचे क्रिएटिनिन वाढू शकते, ज्याची पातळी साधारणपणे 1 पेक्षा कमी असावी. मूत्रपिंडाचे काम शरीरातील द्रवपदार्थांमध्ये असलेली घाण साफ करणे आहे, जर त्यात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com