Guru Purnima Rashinusar Dan : आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात या पौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. या दिवशी गुरुंची पूजा करणे, त्याचा आदर करणे व तसेच त्यांना दानधर्म देखील केली जाते.
यंदा ही गुरुपौर्णिमा आज म्हणजेच ३ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या गुरुजींना दान देणार असाल तर कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय दान करावे हे जाणून घेऊया. (Wishes for Guru Purnima)
गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार, महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म इसवी सन 3000 पूर्वी या दिवशी झाला होता. या दिवशी गुरुंचा महिमा, महत्त्व (Importance) व आदर व्यक्त केला जातो.
ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना गुरुपौर्णिमेला भगवान विष्णू (Lord Vishnu) आणि गुरूची कृपा हवी असेल यांनी या दिवशी लाल रंगाचे कपडे, मध, गूळ आणि लाल रंगाची फळे दान करावीत. याशिवाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना खीर बनवून खाऊ घालणे देखील फायदेशीर आहे.
वृश्चिक राशींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मध, लाल रंगाची मिठाई व कपडे, गूळ गरजू लोकांना दान करावेत. या उपायाने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.
धनु राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना पिवळे कपडे, हरभरा डाळ आणि बेसन दान करावे. या उपायाने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो तसेच करिअरमध्ये प्रगती होते.
मकर राशींच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना छत्री, चामड्याचे बूट आणि काळे तीळ दान करावे.
कुंभ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काळी उडीद डाळ, काळ्या रंगाचे कपडे, ब्लँकेट आणि छत्र्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला दान कराव्यात.
मीन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या (Gurupurnima) दिवशी हरभरा डाळ, हळद, बेसन आणि पिवळे वस्त्र दान करावे. हे तुमच्यासाठी शुभ मानले जाते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.