Guru Purnima 2023: चिमुकल्यांच्या कुंडलीत गुरु दोष आहे ? गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे 4 उपाय करा, भविष्य होईल उज्ज्वल

Guru Dosh In Kundali : आपल्या आयुष्यात आई-वडीलांना पहिले गुरु मानले जाते.
Guru Purnima 2023
Guru Purnima 2023Saam tv
Published On

Guru Purnima Upay: गुरुविण कोण दाखविल वाट..., हिंदू धर्मात गुरुला अधिक महत्त्वाचे मानले जाते. गुरु हा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी महत्त्वाची व्यक्ती. आपल्या आयुष्यात आई-वडीलांना पहिले गुरु मानले जाते.

परंतु, आपल्या जीवनात अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत असणारी कोणतीही व्यक्ती ही गुरु समानच आहे. आयुष्याच्या वळणावर आपल्या प्रत्येक लहान-मोठ्यांकडून काहीना काही शिकायला मिळते. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

Guru Purnima 2023
Guru Purnima Shubh Muhurt 2023 : गुरुब्रह्मा, गुरुर्विष्णु...; यंदा गुरु पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या तिथी व शुभ मुहूर्त

यावर्षी गुरुपौर्णिमा ३ जुलै २०२३ रोजी आहे. याला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार, महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म इसवी सन 3000 पूर्वी या दिवशी झाला होता. या दिवशी गुरुंचा महिमा, महत्त्व (Importance) व आदर व्यक्त केला जातो.

जर तुमच्या चुकीमुळे गुरुचे मन दुखावले असेल तर किंवा कुंडलीत गुरु दोष असेल तर नोकरी, संपत्ती, संतती सुख व वैवाहिक (Marriage) जीवनात अडचणी येतात. अशा वेळी गुरु दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अंत्यत शुभ मानला जाणार आहे. जाणून घेऊया याबद्दल

Guru Purnima 2023
Money Astro Tips : रस्त्यात सापडलेल्या पैशांनी बदलेल तुमचे भाग्य, कसे ते जाणून घ्या ?

गुरुपौर्णिमेला करा हे उपाय

1. आर्थिक

व्यासमूनीना भगवान विष्णूचे अंश मानले जात. शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची कथा सांगितल्याने घरातील वातावरण सकारात्मक होते. आनंदाचे वातावरण निर्माण होते. आर्थिक (Money) संकटांचा सामना करत असाल तर नशिबाचे टाळे उघडतील.

2. करिअर

गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुला किंवा बृहस्पती देवाला पिवळ्या वस्तू अर्पण करा. 'ओम बृहस्पतये नमः' या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा. असे मानले जाते की यामुळे कुंडलीत बृहस्पति बलवान होतो. व्यवसायात प्रगतीचा मार्ग सुकर आहे. गुरु दोषामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील.

Guru Purnima 2023
Monthly Horoscope July 2023: जुलै महिना या राशींसाठी शुभ ! नोकरीत बढतीची शक्यता, प्रेमी जोडप्यांचे भांडण मिटेल...

3. विद्यार्थ्यांनी हे कराच

गुरूच्या अशुभ प्रभावामुळे शिक्षणात अडथळे येत असतील तर तुमच्या गुरुना पिवळ्या रंगाचे फुल द्या. भगवान विष्णूची आराधना करा. ओम ह्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः चा जप करावा. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील.

4. जोडप्यांनी

कुंडलीत गुरू कमजोर असल्यास संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात. नि:संतान जोडप्याने या दिवशी भगवान विष्णूला केशर, पिवळे चंदन अर्पण करावे. गुरुपौर्णिमेला गरजूंना गुळाचे दान करावे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com