Black Kadhai Cleaning Tips
How to Clean Black KadhaiSaam TV

How to Clean Black Kadhai : जेवण करपल्याने काळी झालेली कढई मिनिटांत चकचकीत चमकेल; ट्राय करा 'हा' उपाय

Black Kadhai Cleaning Tips : काळी झालेली कढई पुन्हा स्वच्छ करणे काहीसं कठीण असतं. त्यामुळे कढई कशी क्लिन केली जाते याच्याच काही ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत.
Published on

जेवण बनवताना ते करपले तर कढई काळी पडते. तसेच जेवण बनवण्यासाठी सतत कढईचा वापर केल्याने देखील काही दिवसांनी ती काळी होण्यास सुरुवात होते. जेवण बनवताना आपण त्यात तेल आणि विविध पदार्थ शिजवतो. गॅसवर कढई तापल्यानंतर पदार्थ कढईला चिकटतात.

Black Kadhai Cleaning Tips
Clothes Cleaning Tips: कपड्यांवरील शाईचे डाग निघत नाहीत? या ट्रिक्स फॉलो करा

कढईला असलेलं तेल आणि करपल्यामुळे चिकटलेले पदार्थ यांमुळे कढई साफ करणे फार कठीण होते. कढई सहज आणि झटपट साफ करता येत नाही. त्यामुळे कढई हळूहळू काळी पडत जाते. कढई काळी पडल्यावर त्यात जेवण बनवू नये असंही काही व्यक्तींना वाटू लागतं.

त्यांमुळे भांडी घासताना सर्वात काळी झालेली कढई किंवा तवा सुद्धा अगदी चकचकीत स्वच्छ करण्याची जबाबदारी महिलांवर असते. मात्र अशा पद्धतीने कढई साफ करताना बरीत मेहनत घ्यावी लागते. काथ्याने भांडी घासताना हात अगदी दुखून येतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काळीकुट्ट झालेली कढई कशी साफ करायची याबद्दल माहिती शोधली आहे.

साहित्य

पीठ - २ ते ३ चमचे

तांदूळ - २ चमचे

डिशवॉश बार - २ चमचे

मीठ - १ चमचा

बटाटा - १

कृती

कढई स्वच्छ करण्यासाठी लिक्विड बनवताना सर्वात आधी एक डिशवॉश बार बारीक चिरून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडं पीठ, तांदूळ आणि मीठ टाकून एकत्र मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने तयार झालेलं मिश्रण बटाटा मधोमध कापून त्यावर हे लिक्विड घ्या आणि कढईवर घासण्यास सुरूवात करा.

या टिप्सने कढई अगदी एका दिवसात चमकणार नाही. मात्र तु्म्ही आठवडाभर हे लिक्विड अप्लाय केले तर त्याने कढई अतिशय स्वच्छ होईल आणि चकचकीत चमकेल.

Black Kadhai Cleaning Tips
Monsoon Cleaning Tips : चहा गाळल्यानंतर पावडर फेकून देताय? थांबा! पावसाळ्यातील दुर्गंधी मिनिटांत होईल दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com