Monsoon Cleaning Tips : चहा गाळल्यानंतर पावडर फेकून देताय? थांबा! पावसाळ्यातील दुर्गंधी मिनिटांत होईल दूर

Tea Powder Benefits : भारतात मोठ्या प्रमाणात चहाचे सेवन केले जाते. हाच चहा प्यायल्यानंतर उरलेली चहा पावडर फेकून न देता, त्याचा उपयोग स्वच्छतेसाठी करा. पावसाळ्यात वाढणारी दुर्गंधी यामुळे दूर होईल.
Tea Powder Benefits
Monsoon Cleaning TipsSAAM TV
Published On

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण चहाप्रेंमी असतात. प्रत्येक घरात एकतरी असा माणूस असेल जो दिवसातून तीन ते चार वेळा चहाचा आस्वाद घेत असेल. पावसाळ्यात तर चहा मोठ्या प्रमाणात वापरी जाते. कारण यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तर मग चहासाठी वापरलेली चहा पावडर फेकून न देता त्या वापरलेल्या चहा पावडरचा देखील आपण स्वच्छतेसाठी पुनर्वापर करू शकतो. यामुळे पावसाळ्यात निमार्ण होणारी दुर्गंधी दूर होते.

चहा बनवून झाल्यानंतर उरलेली चहा पावडर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी आणि एका प्लेटमध्ये काढून पंख्याखाली किंवा उन्हात वाळवावी. अशाप्रकारे चहा पावडरचा आपण पुनर्वापर करू शकतो.

दुर्गंधी होईल दूर

पावसाळ्यात दमट हवामानामुळे घरात अस्वच्छता आणि दुर्गंधी वाढते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी चहा पावडर उपयोगात येते. घरात किचनमध्ये, फ्रिजमध्ये एका छोट्या बॅगमध्ये वापरेली चहा पावडर भरून ठेवावी. घरातील दुर्गंधी हळूहळू कमी होईल.

पायपुसणी

पायपुसणीच्या स्वच्छतेसाठी तुम्ही वापरेली चहा पावडर उपयोगात आणू शकता. पायपुसणीचा नियमित वापर होत असल्यामुळे ते लवकर खराब होते आणि त्याला उग्र वास येऊ लागतो. त्यामुळे पावसाळ्यात पायपुसणी आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावी. पायपुसणी स्वच्छ धुवताना वॉशिंग पावडरमध्ये चहा पावडर घालून कोमट पाण्याने पायपुसणी स्वच्छ करावी.

Tea Powder Benefits
Plastic Containers : प्लास्टिकची भांडी ४ वेळा साबणाने स्वच्छ धुवूनही जेवणाचा वास येत आहे? मग आजच ट्राय करा 'ही' ट्रिक

लाकडी फर्निचर

लाकडी फर्निचर हे टिकाऊ आणि उत्तम डिझाईनमध्ये असतात. पण कालांतराने लाकडी फर्निचर खराब होतात. त्यांना धूळ लागते. खराब झालेले लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात वाळवलेल्या चहा पावडर आणि पाणी मिक्स करून त्यात एक कपडा भिजवून तो लाकडी फर्निचरवर चोळावा. यामुळे फर्निचरची चमक टिकून राहील आणि फर्निचर दीर्घकाळ टिकेल.

झाडांना खत

वापरेली चहा पावडर झाडांसाठी उत्तम खत आहे. यामुळे रोपांची चांगली वाढ होते. चहा पावडर मातीत मिसळून झाडांच्या मुळात खत म्हणून वापरता येते. झाडाला बहर लवकर येतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Tea Powder Benefits
Ginger Growing Tips : बाल्कनीत छोट्या कुंडीत लावा अदरक अन् रोज प्या गरमागरम आयुर्वेदिक चहा, आजार जातील पळून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com