Best Cooking Oil: स्वयंपाकात वापरा 'हे' तेल आणि जगा निरोगी जीवन

Oil for Heart Health: भारतात प्रत्येक भाजीत किंवा रोजच्या आहारात तेलाचा समावेश असतोच. जे लोक रोज चमचमीत पदार्थ खातात त्यांच्या शरीरात फॅट किंवा चरबी वाढलेली दिसते.
Best Oil for Cooking
Healthy Cooking Oilmeta ai
Published On

भारतात प्रत्येक भाजीत किंवा रोजच्या आहारात तेलाचा समावेश असतोच. जे लोक रोज चमचमीत पदार्थ खातात त्यांच्या शरीरात फॅट किंवा चरबी वाढलेली दिसते. तसेच ते सगळ्यात जास्त जाड म्हणजेच लठ्ठ दिसतात. म्हणजेच आपल्या आवडीचे रोज खाल्याने तुमच्या शरीराला ह्रदयरोगांचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला डॉक्टर नेहमीच तेल कमी वापरण्याचा सल्ला देत असतात.

Best Oil for Cooking
Soft Idli Recipe: मऊ लुसलुशीत इडली घरच्या घरी कशी बनवायची? सोपी रेसिपी करा ट्राय

तज्ज्ञांचे मत

मात्र ही बाब आपण सहज दुर्लक्षित करतो आणि आपली चांगली जीवनशैली आपणचं बिघडवतो. तुम्ही कोणताही पदार्थ म्हणजे भाजी किंवा डाळ असे रोजच्या आहारातले पदार्थ तयार करत असताना तुम्हाला तेलाचा वापर करावा लागतो. त्यासाठी योग्य तेल कोणते हे आज आपण पुढील माहितीतून जाणून घेणार आहोत.

शरीरासाठी फायदेशीर तेल कोणतं?

तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात खाण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. हे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवत नाही. तसेच या तेलात असणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटीअ‍ॅसिड असते. त्याने तुम्हाला ह्दयासंबंधित कोणताही आजार होत नाही. जर तुम्हाला हदयासंबंधित काही समस्या असतील तर त्या ही कमी करण्याचं काम हे तेल करतं.

Best Oil for Cooking
Hair Fall Solution: आठवड्याभरात थांबेल केसगळती; नारळाच्या तेलात मिसळा 'हे' दोन पदार्थ

मोहरीच्या तेलाचे फायदे काय?

मोहरीच्या तेलाला जास्त सुंगध असतो. हे तेल तुम्ही जास्त गरम करून वापरू शकत नाही. तसेच या तेलात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतं, जे मेंदू आणि तुमच्या हार्टसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. याने तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतो. तर त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा याचा पुरेपुर वापर होतो.

ऑलिव्ह ऑइलचे फायदे

तुम्हाला ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलच्या समस्या उद्भवण्याचा धोका कमी असतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई चा समावेश असतो. जे शरीरासंबंधित वेगवेगळ्या क्रियांमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. तसेच तुम्ही तुमच्या पसंतीनुसार तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल आणि सुर्यफुलाच्या तेलाचा सुद्धा वापर करून उत्तम आरोग्य जपू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Best Oil for Cooking
Exam Tips: मुलं बोर्डाच्या परीक्षेला जाताहेत? पालकांनी 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com