Hair Fall Solution: आठवड्याभरात थांबेल केसगळती; नारळाच्या तेलात मिसळा 'हे' दोन पदार्थ

Natural Hair Care Tips: प्रत्येक महिला तिच्या त्वचेच्याच नाहीतर केसांच्या सौंदर्याने सुद्धा सुंदर दिसते. प्रत्येक महिलेला तिच्या केसांची काळजी घ्यायला प्रचंड आवडते. मात्र सध्याची जिवनशैली पाहता त्याचा थेट परिणाम महिलांच्या केसांवर होताना दिसतोय.
Natural Hair Care Tips
Hair Fall SolutionAi
Published On

प्रत्येक स्त्री तिच्या त्वचेच्याच नाहीतर केसांच्या सौंदर्याने सुद्धा सुंदर दिसते. प्रत्येक महिलेला तिच्या केसांची काळजी घ्यायला प्रचंड आवडते. मात्र सध्याची जिवनशैली पाहता त्याचा थेट परिणाम महिलांच्या केसांवर होताना दिसतोय. महिलांच्या खाण्याच्या पद्धती बदलल्याने केसांच्या मजबूतीवर परिणाम होताना दिसतोय. त्यात महिलांचे केस जास्त पातळ होऊ लागलेत. किंवा मोठ्या संख्येने ते गळू लागलेत. याचाच विचार करून आम्ही महिलांसाठी काही घरगुती उपाय आणले आहेत.

Natural Hair Care Tips
Personal Safety Tips For Women : महिलांनी प्रवास करताना ४ गोष्टी लक्षात ठेवाच; स्वत:च करा स्वत:ची सुरक्षा

केस वाढवण्यासाठी केसांना आवश्यक पोषण मिळणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जर केसांवर काही उपाय करून त्यानेच केस चांगले दाट होतील या भ्रमात असाल तर हे चुकीचे ठरेल. तुम्हाला जर जाड आणि लांबसडक केस हवे असतील तर तुम्ही आहारात काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तसेच त्या संपुर्ण आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्या, डाळी, अंडी यांसारखे पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

नारळाचे तेल

तुम्ही नारळाचे तेल, मेथीचे दाणे आणि कडीपत्ता या तिघांचं एकत्र करून तेल तयार करू शकता. ते कसे तयार करायचे ही संपुर्ण माहिती जाणून घ्या.

नारळाचे तेल

एक वाटी नारळाचं तेल गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात एक चमचा मेथीचे दाणे आणि कढीपत्ता घाला. आणि गॅस बंद करून तेल थंड करा.

Natural Hair Care Tips
Home Remedy For Cough: रात्री खूप खोकला येत असेल तर 'हे' 4 घरगुती उपाय करून मिळवा त्वरित आराम

तेल अप्लाय कसे करावे?

तुम्ही तेल हलकं गरम असतानाच केसांना लावू शकता. तसेच केस धुण्याच्या एक ते दोन तास आधी तुम्ही लावू शकता. त्याचसोबत तुम्ही रोजच्या वापरासाठी या तेलाचा वापर करू शकता. तुम्ही जर आठवड्यातून दोनदा हे तेल वापरले तर फक्त एका महिन्यात सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवेल.

केसांसाठी महत्वाच्या टिप्स

तुमचे केस जर लहानपणापासूनच बारिक किंवा कमी उंचीचे असतील तर ते तसेच राहतील. मात्र जर केस सतत गळत असतील तर तुम्हाला रोजच्या वापरासाठी हे नारळाचे तेल खूप उपयोगी ठरेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Natural Hair Care Tips
Marathi Bhasha Din Speech: मराठी भाषा दिनानिमित्त मुलांना द्या 'हे' प्रेरणादायी भाषण; शिक्षकांनाही वाटेल अभिमान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com