Exam Tips: मुलं बोर्डाच्या परीक्षेला जाताहेत? पालकांनी 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा...

Student Exam Tips: सध्या प्रत्येकाच्या घरात मुलांच्या परिक्षेचे वातावरण सुरू आहे. पालकांसाठी मुलांच्या परीक्षा म्हणजे त्यांची सुद्धा परीक्षाच असते.
Student Exam Tips
Exam Tipsai
Published On

सध्या प्रत्येकाच्या घरात मुलांच्या परिक्षेचे वातावरण सुरू आहे. पालकांसाठी मुलांच्या परीक्षा म्हणजे त्यांची सुद्धा परीक्षाच असते. प्रत्येक पालकांना वाटत असतं आपल्या मुलांनी अभ्यासात पुढे असावे. मात्र बऱ्याच वेळेस मुलं तुम्ही घाईगडबडीत महत्वाचे साहित्य किंवा कागदपत्रे घरीच विसरून जातात. अशा वेळेस पालक त्यांना मदत करतील अशी आशा त्यांना असते.

Student Exam Tips
Hair Fall Solution: आठवड्याभरात थांबेल केसगळती; नारळाच्या तेलात मिसळा 'हे' दोन पदार्थ

तुम्हाला माहितच असेल दहावी बोर्डाच्या परिक्षेला सुरुवात झाली आहे. मुलांचा ताण आता वाढत चालला आहे. दहावीचा आता मराठीचा पहिलाच पेपर झाला आहे. मग पालक म्हणून तुम्ही तुमचं मुल परीक्षेला जाताना काही गोष्टी सांगणे आणि तपासणे महत्वाचे आहे. त्यापुढील प्रमाणे आहेत.

१. मुलांचा अभ्यास

पालकांनी मुलांचा अभ्यास घेणं इथे फार महत्वाचे आहे. बरेच पालक मुलं त्यांचा अभ्यास करतील याचं भ्रमात असतात. मात्र मुलांना परीक्षेच्या काळात रिवीजन घेणारी व्यक्ती सोबत असणे खूप फायदेशीर ठरू शकते.

२. परीक्षेपुर्वी काय करावे?

मुलांना परिक्षेच्या दोन तास आधी अभ्यास ठेवून थोडे रिलॅक्स करा. त्यांच्या मनात अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी असतील तर त्या विचारा. त्याने मुलांचे मन हलके होईल आणि त्यांचे लक्ष फक्त परीक्षेवर राहील.

३. परिक्षेला जाताना लागणारे साहित्य

मुलं जर बोर्डाच्या परिक्षेला जात असतील तर हॉल तिकीट त्यांच्या बॅगेत आहे का? हे नेहमी न चुकता तपासा. समजा ते घरी राहिलचं तर त्यांना त्वरित सेंटरवरील अधिकारांन्या ही बाब कळवण्याचे सांगा. घरच्यांना कळवायला सांगुन परीक्षेला बसण्याची परवानगी घ्या. हा महत्वाचा सल्ला मुलांना द्या.

४. परीक्षेला जाताना काही टिप्स 

पालकांनी मुलांना हे नक्की सांगा

परीक्षेच्या किमान दोन ते दीड तास आधी अभ्यास बाजूला ठेऊन डोकं शांत ठेवा असा मुलांना सल्ला द्या. मनातली भिती काढून टाका. सर्व कामं करून वेळेत परीक्षेला जावे. मुलांना किमान एक तास आधी परीक्षेच्या केंद्रावर पोहोचवा. यामुळे मुलांना वर्ग आणि जागा शोधण्यास वेळ मिळू शकेल. हॉल तिकीट तपासून घ्या.

Student Exam Tips
International Womens Day 2025: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एमटीडीसीकडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com