Benefits Of Hing : नाभीत हिंग लावल्यास पोटाचे अनेक विकार होतील दूर !

हिंग जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्याला अनेक फायदे देते.
Benefits Of Hing
Benefits Of Hing Saam Tv
Published On

Benefits Of Hing : स्वयंपाकघरातील कोणत्याही पदार्थात प्रामुख्याने वापरला जाणारा मसाला हिंग. ज्यामुळे पदार्थाची चव वाढते. परंतु, हिंग जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्याला अनेक फायदे देते.

जर तुम्ही नाभीमध्ये हिंग लावली तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाभीत हिंग लावल्याने पोटासाठी (Stomach) विशेष फायदा होतो. नाभीमध्ये हिंग लावल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. कारण हिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. चला तर मग जाणून घेऊया नाभीत हिंग लावल्याने कोणते फायदे होतात.

Benefits Of Hing
Lotus Stem Benefits : कोलेस्ट्रॉलसोबत वजनही नियंत्रणात ठेवायचे आहे ? 'या' फुलाचे देठही ठरेल फायदेशीर !

1. गॅस किंवा अॅसिडिटीमध्ये फायदेशीर

गॅस किंवा अॅसिडिटीची तक्रार असल्यास नाभीमध्ये हिंग लावल्याने फायदा होतो. कारण पाण्यात हिंग मिसळून नाभीत लावल्यास गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

2. पोट फुगण्याची समस्या दूर होते

पोट फुगण्याची तक्रार असल्यास नाभीमध्ये हिंग लावल्याने फायदा होतो. कारण हिंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जळजळ कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

3. मासिक पाळीच्या वेदनांवर फायदेशीर

पीरियड्स दरम्यान महिलांना वेदना आणि क्रॅम्प्सची तक्रार असते, पण मासिक पाळीदरम्यान महिलांनी नाभीमध्ये हिंग लावल्यास वेदना आणि क्रॅम्प्सच्या समस्येपासून मुक्ती मिळते.

Benefits Of Hing
Aloe Vera Juice Benefits : अॅनिमियापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत दररोज प्या कोरफडचा ज्यूस, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे!

4. पोट फुगण्याची समस्या दूर होते

पोट फुगल्याच्या वेळी नाभीमध्ये हिंग लावल्याने फायदा होतो. कारण हिंगात मोहरीचे तेल मिसळून नाभीजवळ मसाज केल्यास पोट फुगण्याची समस्या दूर होते.

5. पोटदुखीवर फायदेशीर (benefits)

जर कोणाला पोटदुखीची तक्रार असेल तर त्याने नाभीत हिंग लावावी. कारण हिंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे पोटदुखीची समस्या दूर करण्यात मदत करतात. यासाठी मोहरीच्या तेलात हिंग मिसळून मसाज करावा.

6. पोटला थंडावा मिळतो

नाभीवर हिंग लावल्याने पोटाला थंडावा मिळतो. यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये हिंग मिसळून नाभीमध्ये लावावे. यासोबतच याच्या सेवनाने अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com