Nail Care : तुमचीही नखं काळी पडतात का? पावसाळ्यात अशी घ्या काळजी!

Beauty Tips : कधी कधी यामुळे काही आजार होण्याची शक्यता असते, म्हणून वेळीच पायाच्या नखांची काळजी घायला हवी . ती काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण सदर लेखद्वारे जाणून घेऊयात.
Beauty Tips
Nail CareSaam TV
Published On

आपण आपल्या चेहऱ्याची नेहमीच काळजी घेत असतो,निवडक facewash, साबण वापरतो,त्याचबरोबर केसांचीही योग्य काळजी घेतो पण आपल्या नखांची योग्य ती काळजी घेत नाही , हाताच्या नखांची काळजी घेतली जाते पण पायांच्या नखांकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. नखांची योग्य स्वच्छता न राखल्यास त्यात घाण साचून राहते आणि त्यामुळे नखं काळसर पडतात. कधी कधी यामुळे काही आजार होण्याची शक्यता असते, म्हणून वेळीच पायाच्या नखांची काळजी घायला हवी . ती काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण सदर लेखद्वारे जाणून घेऊयात.

Beauty Tips
Winter Beauty Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? हे घरगुती उपाय करुन पाहा, लगेच दिसेल फरक

नखं काळसर पडतात

पावसाळ्यात आपण आपल्या शरीराची विशेष काळजी घेत असतो. परंतु नखांकडे लक्ष देत नाही, नखांकडे लक्ष न दिल्यास आपल्या नखात घाण साचते. घाण साचल्यामुळे ती काळी पडतात. त्यात फंगल इन्फेक्शनही होऊ शकतो. फंगल इन्फेक्शनमुळे नखाच्या बाजूचा भाग सुजतो. म्हणूनच पावसाळ्यात नखाची विशेष काळजी घ्यायला हवी.

नखांची घ्या अशी काळजी

सद्या पावसाळा सुरू आहे, ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचते या साचलेल्या पाण्यातून आपल्याला प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे अशा साचलेल्या पाण्यामुळे आपण सहज आजारी पडू शकतो.

सतत पाण्यामध्ये राहिल्याने आपल्या पायांची नखं ही ओली होतात त्यामुळे नखांमध्ये घाण जमा होऊन बुरशी होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी आठवड्यातून एकदा तरी नखं ही स्वच्छ करायला हवीत.

नखांची निगा कशी राखावी

आपण पार्लरमध्ये जाऊन हाताच्या नखांसाठी मनिक्युअर करतो तर पायाच्या नखासाठी पेडिक्युअर करतो पण हा खर्चिक जास्त असल्याने आपण पार्लर मध्ये जाण्यास टाळतो, त्यामुळे पार्लरला जाणं शक्य नाही झाल्यास आपण घरातच हातापायाच्या नखांची विशेष काळजी घेऊ शकतो .

आठवड्यातून एकदा तरी गरम पाण्यात पाय ठेवून किमान 15- 30 मिनिटं बसावं .

गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबू मिसळा याने नखातील घाण निघण्यास मदत होईल. टूथब्रशने नखं स्वच्छ करा .

गरम पाण्यात आपल्या पायांची नखं ही नरम होतात त्यावेळी नखं कापून नखांना बारीक करा जेणेकरून बारीक नखात घाण साचली जाणार नाही. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा प्रश्न उदभवणार नाही.

रोजच्या कामामुळे आपण थकलेलो असतो, त्यामुळे आठवडी सुट्टीला आपण आराम करण्यास पहिलं प्राधान्य देतो. त्यामुळे आपल्याकडे पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही हायड्रोजनच्या सहाय्यानेही नखं स्वच्छ करू शकता.

हायड्रोजनचे 2-3 थेंब पायाच्या नखांमध्ये टाका, आणि

2 मिनिटानंतर नखातून जी घाण बाहेर पडेल ती कॉटनच्या माध्यमातून स्वच्छ करा.

Beauty Tips
Beauty Skin Tips : रखरखत्या उन्हात मेकअप मेल्ट होतोय? मग 'या' टीप्स फॉलो करा, घाम आला तरी स्किन ग्लो करेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com