कोमल दामुद्रे
लांब आणि सुंदर नखे कोणाला आवडत नाहीत, नखे लांब आणि मजबूत असतील तर हातांचे सौंदर्य वाढते.
पण कितीही प्रयत्न केले तरी हातांच्या बोटांची नखे वाढत नाही अशावेळी आपण या टिप्स फॉलो करायला हव्या
लसणाच्या पाकळ्या नखांवर १० मिनिटे चोळा. असे केल्याने, तुम्हाला आठवड्याभरात परिणाम दिसू लागतील.
नखांवर ऑलिव्ह ऑईल लावल्याने नखांची वाढ लवकर होते.
नखांवर खोबरेल तेल लावून, तुमची नखे वेगाने वाढतील.
ऍपल सायडर व्हिनेगर नखांवर 10 मिनिटांसाठी सोडा त्यामुळे नखे वेगाने वाढतात.
अंड्याचा पांढरा भाग दुधात फेटा आणि त्यात तुमची नखे ५ मिनिटे बुडवा. असे केल्याने तुमच्या नखांची वाढ वाढेल.
मोहरीच्या तेलाचा मसाजही नखांसाठी गुणकारी आहे.
असे रोज रात्री झोपण्यापूर्वी असे केल्याने तुमची नखे न वाढण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.