Badlapur Picnic Spot : रखरखत्या उन्हात बदलापूरमधील फिरण्यासारखे भन्नाट पिकनिक स्पॉट

Badlapur Tourist Places : शाळेलाही सुट्ट्या लागल्यात त्यामुळे तुम्ही छोट्या ट्रीपच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. कारण यामध्ये आम्ही बदलापूरमधील काही पिकनीक स्पॉट सांगणार आहोत.
Badlapur Tourist Places
Badlapur Picnic SpotSaam TV

बदलापूर हे एक असं शहर आहे जिथे तुम्हाला कायम प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. मात्र येथील निसर्ग आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली अनेक घरं पाहून मुंबई सारख्या शहरातून अनेक व्यक्ती येथे सुट्टीच्या दिवशी नक्की भेट देतात. सध्या प्रचंड उन्हाळा सुरू आहे तसेच शाळेलाही सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे तुम्ही छोट्या ट्रीपच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. कारण यामध्ये आम्ही बदलापूरमधील काही पिकनीक स्पॉट सांगणार आहोत.

Badlapur Tourist Places
Tourist Ticket | एकदाच तिकीट काढा अन् दिवसभर मुंबई फिरा

बारावी डॅम

बदलापूरमधीस बारबी डॅम फार प्रसिद्ध ठिकाण आहे. दरवर्षी येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. येथे पोहचण्यासाठी तुम्ही बाय रोड गेल्यास उत्तम. कारण येथे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी आहे. त्यामुळे येथील वातावरण कायम शांत आणि थंड असते. तुम्ही लाँग ड्राइव्हसाठी आणि पिकनिकसाठी सुद्धा येथे जाऊन आनंद घेऊ शकता.

मुळगाव

बदलापूरमधील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मुळगाव. या गावात खंडोबा देवाचे देवस्थान आहे. तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे भेट देऊ शकता. कारण मंदिराच्या चारही बाजूंनी गर्द झाडी आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावात खंडेरायाचे मंदिर असल्याने येथील शोभा आणखी वाढते. खाण्यासाठी येथे सुरुवातीला काही हॉटेल्स दिसतील. जर तुम्हाला वडापाव खायला आवडत असेल तर मुळगावचा फेमस वडापाव नक्की ट्राय करा.

श्री महागणपती मंदिर

बदलापूर गावात श्री महागणपती मंदीर आहे. हे एक ऐतिहासीक ठिकाण आहे. बाळाजी विश्वनाथ यांनी १९८१ मध्ये मंदिराचा जिर्णोध्दार केला. संकष्टी आणि मंगळवार या दोन दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

चिखलोली

बदलापूर गावामध्ये चिखलोली नावाचं एक गाव आहे. हे गाव देखील निसर्गाच्या सानिध्यात वसलं आहे. या गावातही एक डॅम आहे. येथे सुट्टीच्या दिवशी एन्जॉय करण्यासाठी तुम्ही मित्रांसह जाऊ शकता. येथे पोहचण्यासाठी बदलापूर स्थानकातून बाहेर पडल्यावर रिक्षा करून तुम्ही जाऊ शकता.

Badlapur Tourist Places
Tourist Places in Rishikesh: ऋषिकेश जवळील नयनरम्य ठिकाणं; कमी खर्चात करा भरपूर एन्जॉय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com