Atal Bihari Vajpayee Death Anniversary: आपण मित्र बदलू शकतो पण..., अटल बिहारी वाजपेयींचे प्रेरणादायी विचार

Atal Bihari Vajpayee Thoughts : अटल बिहारी वाजपेयी हे एक कुशल राजकारणी, तेजस्वी कवी व वक्ता होते.
Atal Bihari Vajpayee Death Anniversary
Atal Bihari Vajpayee Death AnniversarySaam tv
Published On

Atal Bihari Vajpayee Quotes :

देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. अटल बिहारी वाजपेयी हे एक कुशल राजकारणी, तेजस्वी कवी व वक्ता होते.

त्याचे विचार भारतीय राजकारणालाच नव्हे तर सर्वसामान्यांनाही मार्ग दाखवतात. राज कारणात ते चार दशक सक्रीय होते. ते नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली. आज त्याच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्याचे प्रेरणादायी विचार.

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
Loan Rate Hike : कर्जाचा बोजा वाढणार! ऑगस्ट महिन्यात या बँकांनी वाढवला EMI चा हफ्ता, पाहा संपूर्ण लिस्ट

1. आम्ही आमच्या पद्धतीने देशाची (World) सेवा करत आहोत.जर आम्ही देशभक्त नसतो तर राजकारणात निस्वार्थ भावाने आपली जागा तयार करण्याचा प्रयत्न कधी केला नसता.

2. लहान मनाने कोणी मोठे होत नाही , तुटलेल्या हृदयाने (Heart) कोणीही उभे राहू शकत नाही.

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
Smallest Hill Station Near Mumbai : मुंबईजवळचं नयनरम्य, पण सगळ्यात छोटं हिल स्टेशन, घरी यावंसंच वाटणार नाही!

3. लोकशाही ही अशी जागा आहे जिथे दोन मूर्ख मिळून शक्तिशाली माणसाचा पराभव करतात.

4. मी नेहमीच आश्वासने घेऊन आलो नाही, तर हेतू घेऊन आलो आहे.

5. आपण मित्र बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही.

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
Train Travel : एका ट्रेनच्या तिकीटावर करता येणार २ महिने प्रवास? कसा ते जाणून घ्या

6. आमचे शेजारी म्हणतात की एका हाताने टाळी वाजत नाही, आम्ही म्हणालो की चुटकी तर वाजू शकते.

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
Famous Place In Vidarbha : स्वर्गाहूनही सुंदर विदर्भातली ही ठिकाणं, निसर्गाचं सौंदर्य पाहून भुरळ पडेलच!

7. मला मरणाची भीती वाटत नाही, पण माझी निंदा होण्याची भीती वाटते.

8. भारताने (India) पुन्हा एक महान राष्ट्र व्हावे, सामर्थ्यवान व्हावे, संपूर्ण जगातील राष्ट्रांमध्ये पहिले स्थान मिळवावे अशी माझी इच्छा आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com