Loan Rate Hike : कर्जाचा बोजा वाढणार! ऑगस्ट महिन्यात या बँकांनी वाढवला EMI चा हफ्ता, पाहा संपूर्ण लिस्ट

EMI Interest Rate Raised: गेल्या तीन आर्थिक धोरणांमध्ये रेपो दर मध्यवर्ती बँकेने स्थिर ठेवला आहे. मात्र, आता काही बँकांकडून व्याजात वाढ करण्यात आली आहे.
Loan Rate Hike
Loan Rate HikeSaam Tv
Published On

Loan Interest Rates (August 2023):

स्वत: च्या हक्काचे घर, कार किंवा इतर व्यक्ती गोष्टींसाठी आपण बँकेतून कर्ज काढतो. मागच्या वर्षभरात कर्जाच्या व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. आरबीआयकडून रेपो रेट वाढवणे हे त्यामागचे कारण होते. परंतु गेल्या तीन आर्थिक धोरणांमध्ये रेपो दर मध्यवर्ती बँकेने स्थिर ठेवला आहे. मात्र, आता काही बँकांकडून व्याजात वाढ करण्यात आली आहे.

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा यांनी ऑगस्टमध्ये MCLR वाढवला आहे. MCLR च्या दरावर बँका कार कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर ठरवतात. जाणून घेऊया कोणत्या बँकेने किती व्याजदर वाढवला आहे.

Loan Rate Hike
Fixed Deposit Scheme : FD पेक्षा जास्त व्याज मिळवा, पैसेही सुरक्षित राहतील

1. बँक ऑफ बडोदा

बँक (Bank) ऑफ बडोदाने सर्व मुदतीसाठी MCLR 5 बेस पॉइंट्स (0.05 टक्के) ने वाढवला आहे. हे नवीन दर 12 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर एक वर्षाचा MCLR 8.00 टक्के झाला आहे.

2. एचडीएफसी बँक

HDFC बँकेने निवडक कालावधीसाठी MCLR 15 बेस पॉइंट्सपर्यंत वाढवला आहे. हे नवे दर 7 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँकेने एका रात्रीत MCLR 10 बेस पॉईंट्सने वाढवून 8.35 टक्के केला आहे. पूर्वी तो 8.25 टक्के होता. एक महिन्याचा MCLR पूर्वी 8.30 टक्क्यांवरून 8.45 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, तीन महिन्यांच्या MCLR मध्ये 10 आधार अंकांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे तो 8.60 टक्क्यांवरून 8.70 टक्के झाला आहे. सहा महिन्यांचा MCLR 8.90 टक्क्यांवरून 8.95 टक्क्यांनी (Rate) 5 बेस पॉईंटने वाढवला आहे.

Loan Rate Hike
Bank FD Schemes Updated (Aug 2023) : बँकेत एफडी करण्याचा विचार करताय? हीच ती योग्य वेळ!

एक वर्षाचा MCLR पूर्वी 9.05 टक्क्यांवरून 5 बेसिस पॉइंट्सने वाढवून 9.10 टक्के करण्यात आला आहे. MCLR मध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ (Time) कोणताही बदल नाही.

3. आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेकडून सर्व मुदतीच्या MCLR मध्ये 5 बेस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर, एक वर्षाचा MCLR 8.40 टक्के, तीन आणि सहा महिन्यांचा MCLR 8.45 टक्के आणि 8.80 टक्के झाला आहे.

Loan Rate Hike
Smallest Hill Station Near Mumbai : मुंबईजवळचं नयनरम्य, पण सगळ्यात छोटं हिल स्टेशन, घरी यावंसंच वाटणार नाही!

4. बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियाने निवडक मुदतीसाठी MCLR वाढवला आहे. या वाढीनंतर ओव्हरनाइट MCLR 7.95 टक्के, तीन आणि सहा महिन्यांचा MCLR 8.30 टक्के आणि 8.50 टक्के आहे. तर एक वर्षाचा MCLR 8.70 टक्के आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com