Ashadhi Ekadashi Special Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे? झटपट बनवा वरीचा पुलाव

Upwas Special Varichya Tandlacha Pulav: महाराष्ट्रात सर्वत्र आषाढी एकादशीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. अनेकांना वारीला जाता येत नाही तरी ही लोक आवर्जून उपवास करतात. आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवला जाणाऱ्या वरीच्या तांदळाच्या पुलावाची रेसिपी जाणून घेऊयात.
Ashadhi Ekadashi Special Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे? झटपट बनवा वरीचा पुलाव
Ashadhi Ekadashi 2024 Special Upvas RecipeSAAM TV

विठूरायाच्या दर्शनाची ओढ सर्व महाराष्ट्राला लागली आहे. अनेक लोक आवर्जून पायी चालत वारी करत विठूरायाच्या दर्शनाला जातात. आषाढी एकादशीला लोक श्रद्धेने उपवास करतात. पण उपवास करताना आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विनाकारण निर्जल उपवास किंवा न खाता पिता उपवास करू नये. मनात खरी श्रद्धा आणि प्रेम असल्यास प्रत्येक देव प्रसन्न होतो. ज्या लोकांना मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब याची समस्या आहे त्यांनी उपवास करताना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी.

आषाढी एकादशी पावसात येत असल्यामुळे उपवास करताना आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण पावसात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जास्त जड पदार्थ खाऊ नये. साबुदाणा, बटाटा शक्यतो टाळावा. कारण पावसात गॅसची समस्या जास्त निमार्ण होते त्यामुळे वातूळ पदार्थ टाळावे. तसेच उपवासाला सतत चहा- कॉफीचे सेवन केल्यास तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आषाढी एकादशीच्या उपवासाला सात्विक भोजन म्हणून गरम दूध, दाण्याची आमटी, ताकाची कढी असे पदार्थ खाऊ शकता. आषाढी एकादशीच्या उपवासाला वडे, चिवडा, वेफर्स खाणे टाळावे. यामुळे पावसात खोकला होऊ शकतो. तुम्ही राजगिऱ्याचे लाडू, ड्रायफ्रूट, खजूर, फळे यांचा समावेश आहारात करावा. यामुळे पोटही दीर्घकाळ भरलेले राहते.

Ashadhi Ekadashi Special Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे? झटपट बनवा वरीचा पुलाव
Ashadhi Wari 2024 : वारी'बाबतच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? एकदा वाचाच पंढरीच्या वारीचा मार्मिक सार

चला तर मग आषाढी एकादशीच्या उपवासाल तुम्हाला झटपट बनवता येईल असा पौष्टिक आणि रुचकर पदार्थाची रेसिपी जाणून घेऊयात

वरीच्या तांदळाचा पुलाव

साहित्य

 • वरीचा तांदूळ

 • साखर

 • मीठ

 • रताळे

 • ड्रायफ्रूट

 • कोथिंबीर

 • दाण्याचा कूट

 • हिरवी मिरची

 • आलं

 • लवंग

 • जिरे

 • तूप

कृती

वरीच्या तांदळाचा पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम वऱ्याचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे. तसेच रताळ्याची साल काढून त्यांचे बारीक तुकडे करून कुकरला उकडून घ्यावे. त्यानंतर ड्रायफ्रूट मंद आचेवर तूपामध्ये परतून घ्यावेत. आता एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये लवंग, जिरे, हिरवी मिरची घालावे. थोड्यावेळाने त्यात वरीचा तांदूळ, उकडलेले रताळ्याचे तुकडे, दाण्याचा कूट चवीनुसीर साखर आणि मीठ घालून सर्व मिश्रण छान शिजवून घ्यावेत. या मिश्रणात रोस्टेड ड्रायफ्रूट टाकून छान एकत्र करून घ्यावेत. शेवटी कोथिंबीर घालून पुलावाचा आस्वाद घ्यावा.

Ashadhi Ekadashi Special Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे? झटपट बनवा वरीचा पुलाव
Jackfruit Recipes : गोड फणसापासून बनवा झणझणीत भाजी, जाणून घ्या झटपट रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com