Ashadhi Wari 2024 : वारी'बाबतच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? एकदा वाचाच पंढरीच्या वारीचा मार्मिक सार

Hindu Rituals : वारी का करतात? याचं महत्व नेमकं काय आहे? याबद्दल मी मला उमगलेल्या वारीबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. म्हणजेच या वारीचा वारकऱ्यांच्या जीवनाशी कसा संबंध जोडला गेलाय ते जाणून घेऊया.
Hindu Rituals
Ashadhi Wari 2024 Saam TV

मोहिनी सोनार

वारी म्हणजे जीवनाचा सार, भक्तांचा आधार, भक्तीचा भवसागर आणि टाळ मृदुंगाचा गजर. ठेचाळलेल्या पायातूनही विठुरायाच्या दर्शनामुळे पारणे फिटणारे डोळे आणि आपल्या माऊलींच्या भक्तीत तल्लीन होऊन जाणारे भक्त भोळे. अशी ही वेड्या भक्तीची थोडक्यात मला उमगलेली वारीची व्याख्या.

Hindu Rituals
Diveghat vari | नागमोडी वळण असणाऱ्या दिवे घाटातील वारीची विहंगम दृश्य | SAAM TV

दरवर्षी लाखो वैष्णवांच्या मेळ्याने पंढरी भरून पावते आणि त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी त्याच्या भक्तीत रंगण्यासाठी हे भक्त खडतर प्रवास करून येत असतात. अगदी पायी चालत, ऊन, वारा पाऊस सोसत त्या विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन हे वारकरी. त्यांच्या विठुरायापर्यंत पोहोचतात. पण ही वारी का करतात? याचं महत्व नेमकं काय आहे? याबद्दल मी मला उमगलेल्या वारीबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. म्हणजेच या वारीचा वारकऱ्यांच्या जीवनाशी कसा संबंध जोडला गेलाय ते जाणून घेऊया.

यामध्ये 5 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे या वारीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय.

या वारीचा प्रवास सुरु असताना खडतर असा दिवेघाट लागतो. त्यात बऱ्याच अडचणी पार करत हे वारकरी हा दिवेघाट पार करतात. अगदी तशाच अडचणी आपल्या आयुष्यातही असतात. त्या सगळ्या अडचणी पार करण्याचं बळ या वारकऱ्यांना या वारीतुन मिळतं. असा त्यांचा समज आहे. जसा हा खडतर दिवेघाट ते पार करतात तसंच त्यांच्या आयुष्यातल्या अडचणीही पार करण्याची शक्ती त्यांना मिळते, असं या वरकाऱ्यांचं म्हणणं आहे.

तर ही झाली पहिली पायरी यानंतर रिंगण केलं जातं. हे रिंगण तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला असंख्य वारकरी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हे रिंगण करताना दिसतात. जणू त्यांच्या विठुरायानेच त्यांना आदेश केले असावेत आशा प्रकारे तो नेत्रदीपक सोहळा होत असतो. आता या रिंगणाचा अर्थ काय तर आनंदाचे रंगी अनंत तरंग. हे रिंगण नेमकं काय आणि कशासाठी करतात ते जाणून घेऊया.

टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठलाचे अभंग आळवीत पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांना एका अनोख्या चैतन्याचं बळ मिळत असतं. पण, सलग वाट चालत असताना वारीला काहीतरी वेगळेपण मिळालं, तर हे बळ द्विगुणीत होत असतं. पालखी सोहळ्यातील हे वेगळेपण म्हणजेच रिंगण सोहळा! 

भान हरपून खेळ खेळतो, 

दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..

भक्तिने भारलेला रिंगण सोहळा

पाहावा ‘याचि देही याचि डोळा’ 

रिंगण हा पालखी सोहळ्याचा एक अविभाज्य भाग असला, तरी वारीच्या परंपरेत त्याला वेगळे स्थान नाही. वारकऱ्यांची पाऊले वाटेवर असताना केवळ चालण्याबरोबर मध्येच काही खेळ खेळायला मिळाले, तर वारीचा आनंद वाढून पुढच्या वाटचालीचा उत्साह वाढतो. त्यामुळेच या रिंगणाचे पालखी सोहळ्यामध्ये स्थान आहे. मुळात वारीच्या वाटेवर शिण, भार दूर करण्यासाठी काही खेळ खेळले जातात. तसंच आयुष्यातही आपण आनंदी राहायला शिकायला हवं. प्रत्येक गोष्ट करत असताना त्यात आनंद शोधावा. कितीही कठीण परिस्थती आली तरी खंबीरपणे आनंदाने अगदी त्याचा सामना करावा न डगमगता. असा समज या वारकऱ्यांचा असतो.

आता येतो धावा म्हणजेच विठ्ठलाच्या भेटीची ओढ. हे हजारो वारकरी विठ्ठलाच्या नामाचा गजर करत त्याच्या भेटीची ओढ दर्शवतात. हे खरोखर स्वर्गासारखं चित्र असतं असं कही जण म्हणतात. मग अभंग, हरिपाठ, भक्ती आणि नामस्मरण या सगळ्यात भोळे भक्त अगदी दंग होतात. आणि शेवटी असा सगळा प्रवास करत ते आपल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात.

अशी ही अखंड वारी जीवनाची दिशादर्शक ठरते. जीवनाचा सार उलगडते आनंद दुःख अडचणी ऊन वारा पाऊस सगळं सोसत वाट ही वारी काढत असते. त्यातूनच जीवनात आलेल्या सगळ्या अडचणींचा सामना करण्यासाठी बळ मिळत असतं.

Hindu Rituals
Diveghat vari | नागमोडी वळण असणाऱ्या दिवे घाटातील वारीची विहंगम दृश्य | SAAM TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com