Jackfruit Recipes : गोड फणसापासून बनवा झणझणीत भाजी, जाणून घ्या झटपट रेसिपी

Jackfruit : रसाळ फणसापासून बनवा झणझणीत, चटपटीत, गोड पदार्थ. जे खाऊन तुमची मुलं खूप खुश होतील आणि दरवर्षी हे पदार्थ खाण्याचा हट्ट करतील.
Jackfruit
Jackfruit RecipesSAAM TV

बाहेरून कितीही काटेरी असलेला फणस आतून नेहमी गोड,रसाळ असतो. अनेकांना फणस खायला आणि त्यापासून विविध रेसिपी बनवायला खूप आवडते. वर्षातून एकदा येणाऱ्या फणसावर खवय्ये तुटून पडतात. आवडीने फणसाचा आस्वाद घेतात. चला तर मग आज आपण फणसापासून चटपटीत रेसिपी बनवूया.

फणसाच्या गऱ्यांचे चिप्स

साहित्य

पावसात फणसाच्या गऱ्यांपासून चिप्स बनवण्यासाठी कच्च्या फणसाचे गरे, खोबरेल तेल, हळद, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते.

कृती

कुरकुरीत फणसाचे चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम फणस फोडून गरे वेगळे काढावे. त्यानंतर गऱ्यातील बी काढून चिप्स बनवण्यासाठी गरे उभे कापून घ्यावेत. दुसरीकडे पॅनमध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये फणसाचे गरे सोडावेत आणि छान तळून घ्यावेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये हळद,मीठाचे पाणी तयार करून घ्यावे. गॅस बंद करून गऱ्यांवर हे पाणी चमच्याने सोडावे. अशाप्रकारे आपले फणसाच्या गऱ्यांचे चिप्स तयार झाले. हे गरे टिश्यू पेपरवर काढून त्यातील तेल काढून घ्यावे. फणसाचे चिप्स दीर्घकाळ ठेवण्यासाठी तुम्ही हवाबंद डब्याचा वापर करावा. यामुळे चिप्स नरम होत नाहीत.

फणसाच्या गऱ्यांची पोळी

साहित्य

फणसाचे गरे, साखर, तूप, दूध, ड्रायफूट इत्यादी साहित्य लुसलुशीत गोड फणसाची पोळी बनवण्यासाठी लागते.

कृती

गोड फणसाची पोळी तयार करण्यासाठी रसाळ फणस घ्यावा आणि त्याचे गरे काढून त्यातील बी वेगळी करून घ्यावी. आता हे गरे मिक्सरला छान वाटून घ्यावेत. एका पॅनमध्ये फणसाचा बारीक केलेला गर, चवीनुसार साखर, आवडीनुसार ड्रायफूट पावडर, थोडे दूध टाकून छान परतून घ्या. एका स्टीलच्या ताटाला तूप लावून हे मिश्रण त्यात छान पसरवून ठेवा. हे ताट सुकण्यासाठी उन्हात किंवा पंख्याखाली काही दिवस ठेवा. तुमची मऊ- गोड फणसाच्या गऱ्यांची पोळी तयार झाली. तुम्ही तूपासोबत याचा आस्वाद घेऊ शकता.

Jackfruit
Monsoon Special Tea: पावसाळ्यात घ्या या गरमा गरम चहाचा आस्वाद, साथीच्या आजारांपासून मिळेल आराम

फणसांच्या आठळ्यांची भाजी

साहित्य

पावसात झणझणीत आठळ्यांची भाजी बनवायची असेल तर आठळ्या, कांदा, टोमॅटो , तिखट-मीठ, धने-जिरे पावडर, हळद, आलं-लसूण पेस्ट, काळी मिरेपूड, तमालपत्र, बेसनपीठ, तेल, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

कृती

मसालेदार आठळ्यांची भाजी करण्यासाठी सर्वप्रथम गऱ्यामधून आठळ्या काढून कुकरमध्ये मीठ घालून छान उकडून घ्या. त्यानंतर आठळ्या थंड झाल्यावर त्यांची साल काढून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, कांदा, टोमॅटो, धने-जिरे पावडर, हळद,आलं-लसूण पेस्ट, काळी मिरेपूड, घालून छान परतून घ्या. कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत मिश्रण छान परता. मसाल्याला पाणी सुटले की मग त्यामध्ये आठळ्या घाला आणि परतून घ्या. थोड्या वेळाने त्यात बेसन पीठ घाला आणि शिजवून घ्या. भाजीत थोडे गरम पाणी टाकून त्यावर झाकण ठेवा. स्वादिष्ट,चवदार आठळ्यांची भाजी कोथिंबीर घालून सजवून घ्या. गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत याचा आस्वाद घ्या.

Jackfruit
Tikhat Shevaya Recipe: नाश्त्याला झटपट बनवा तिखट शेवया; वाचा ५ मिनिटांत तयार होणारी सिंपल रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com