Covid Vaccine: कोरोना लसीमुळे तरूणांचा अचानक होतोय मृत्यू? आरोग्यमंत्र्यांनी अखेर संसदेत दिलं उत्तर

JP Nadda On Covid Vaccine: कोरोना लसीकरणाच्या काही काळानंतर तरूणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं. या लसीकरणामुळे हे मृत्यू होत असल्याचं म्हटलं जात होतं.
 Covid-19 vaccine
Covid-19 vaccine
Published On

कोरोनाला प्रतिबंध व्हावा म्हणून लसीकरण सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान या लसीकरणाच्या काही काळानंतर तरूणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं. या लसीकरणामुळे हे मृत्यू होत असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान यावर संसदेत केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी 10 डिसेंबर रोजी राज्यसभेत सांगितलं की, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासातून हे सिद्ध झालंय की, कोरोना लस भारतातील तरुण प्रौढांमधील अचानक मृत्यूचा धोका वाढला नाही. या उलट त्याचा धोका कमी झाला आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती वरिष्ठ सभागृहाला दिलीये.

 Covid-19 vaccine
Blood Sugar: जेवल्यानंतर पायी चालल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

तरूणांमध्ये मृत्यूचं कारण

जेपी नड्डा म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे ज्यांना यापूर्वी रुग्णालयात दाखल होणं, अचानक मृत्यूची फॅमिली हिस्ट्री आणि काही जीवनशैलीमुळे अचानक मृत्यूचा धोका वाढला होचा. नड्डा यांनी सांगितलं की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) गेल्या वर्षी मे-ऑगस्ट दरम्यान १९ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७ रुग्णालयांमध्ये एक अभ्यास करण्यात आला.

 Covid-19 vaccine
Health News: २६% कमी होईल हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका, झोपण्यापू्र्वी केवळ 'या' सवयी सुधारा

ते म्हणाले की, या अभ्यासामध्ये एकूण 729 आकस्मिक मृत्यूची प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. यामध्ये असं आढळून आलेलं की, कोरोना व्हायरस लसीचा कोणताही डोस घेतल्याने अचानक मृत्यूचा धोका कमी होतो. कोविड-19 लसीचे दोन डोस घेतल्याने अशा मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

 Covid-19 vaccine
Heart Attack Signs: शरीरात होऊ लागले 'असे' बदल तर वेळीच व्हा सावध; हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात

ही औषधं क्वालिटी चेकमध्ये ठरली फेल

आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लेखी उत्तरात माहिती दिलीये की, हिंदुस्तान एंटीबायोटिक लिमिटेड (Hindustan Antibiotic Limited) आणि कर्नाटक एंटीबायोटिक एंड फार्मास्युटिकल्स (Karnataka Antibiotic and Pharmaceuticals Limited) लिमिटेड द्वारे तयार करण्यात आलेली मेट्रोनिडाझोल 400 आणि पॅरासिटामोल 500 एमजी 'नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी' असल्याचं दिसून आलं आहे.

 Covid-19 vaccine
थंडीच्या दिवसात मॉर्निंग वॉकमुळे कमी होतो हार्ट अटॅकचा धोका? तज्ज्ञांनी दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर

अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, फार्मास्युटिकल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड आणि कर्नाटक अँटीबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी नॉन-स्टँडर्ड क्वालिटी (NSQ) स्टॉक मागे घेतला आहे. यासाठी ते नवा स्टॉक पाठवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com