High Blood Pressure: तुमच्या शरीरातही दिसतायत का ही 5 लक्षणं? हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढल्याची लक्षण असू शकतात

Blood Pressure Symptoms: उच्च रक्तदाबाला 'सायलेंट किलर' म्हटलं जातं कारण तो अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवता शरीराला नुकसान पोहोचवतो. वारंवार डोकेदुखी, छातीत दुखणं, चक्कर येणं, मळमळ आणि धूसर दिसणं ही लक्षणं दुर्लक्षित करू नका. वेळेवर तपासणी आणि उपचार महत्त्वाचे आहेत.
BP Control Tips
High Blood Pressure Riskgoogle
Published On

जगभरात हाय ब्लड प्रेशरची समस्या झपाट्याने वाढताना दिसतेय. 2023 च्या आकडेवारीनुसार 30 ते 79 वर्षे वयोगटातील सुमारे 128 कोटी लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी जवळपास 46 टक्के लोकांना आपल्याला हाय ब्लड प्रेशर आहे.

हाय ब्लड प्रेशरला अनेकदा 'सायलेंट किलर' म्हटलं जातं. कारण ही समस्या अनेकदा कोणतीही लक्षणं न दाखवता शरीराला आतून नुकसान करत राहतं. हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी निकामी होणं यांसारख्या गंभीर आजारांचा धोका यामुळे वाढतो. बहुतेक वेळा हाय ब्लड प्रेशरची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र काही लोकांमध्ये शरीर आधीच काही संकेत देत असतं. ही लक्षणं कोणती आहेत ते पाहूयात.

BP Control Tips
Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

वारंवार डोकेदुखी

तीव्र डोकेदुखी हे हाय ब्लड प्रेशरचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. विशेषतः सकाळी उठल्यानंतर सतत डोके दुखत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. काही जणांना डोक्यावर दाब आल्यासारखं वाटतं तर काहींना ठणकणारी डोकेदुखी जाणवते.

छातीत दुखणं

हाय ब्लड प्रेशरमुळे काही लोकांना छातीत दुखणं, दाब आल्यासारखं वाटणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. हे लक्षण हार्ट अटॅक किंवा इतर गंभीर हृदयाच्या समस्यांचेही संकेत असू शकतात. जर छातीत, पोटात किंवा पाठीमध्ये अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

चक्कर येणं

वारंवार चक्कर येणं किंवा हलकं वाटणं हेही हाय ब्लड प्रेशरचं लक्षण असू शकतं. अनेकदा हे इतर कारणांमुळेही होऊ शकतं. मात्र उभं राहताना चक्कर येणं, तोल जाणं किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटत असेल तर हाय ब्लड प्रेशरमुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होत असल्याचं लक्षण असू शकतं.

BP Control Tips
Blood sugar: मधुमेही रूग्णांनी या ३ भाज्या जरूर खाव्यात; ब्लड शुगर राहील नियंत्रणात

मळमळ

पोट बिघडल्यामुळेच मळमळ होतं असं नाही. काही वेळा हाय ब्लड प्रेशर वाढल्यावरही मळमळ किंवा उलटी होऊ शकते. विशेषतः यासोबत हाय ब्लड प्रेशरची इतर लक्षणंही दिसत असतील तर त्वरित तपासणी करून घ्यावी.

धूसर दिसणं

दृष्टी अचानक धूसर होण, डोळ्यासमोर ठिपके दिसणं किंवा डबल व्हिजन हीदेखील हाय ब्लड प्रेशरची गंभीर लक्षणं असू शकतात. रक्तदाब वाढल्यामुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रेटिनापर्यंत रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन दृष्टीवर परिणाम होतो.

BP Control Tips
Blood Sugar Control: ब्लड शुगर अचानक वाढतेय? सकाळच्या या ५ सवयी रक्तातील साखर ठेवतील नियंत्रणात

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com