Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेह

मधुमेह हा आजच्या काळातील एक सामान्य पण गंभीर आरोग्य समस्या बनत चाललाय. चुकीचा आहार आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे या आजाराचा धोका वाढतो. योग्य आहारातील बदल करून हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

blood sugar management | saam tv

Mediterranean Diet

Mediterranean Diet मध्ये फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि ऑलिव्ह ऑईल, नट्स, बिया यांसारखे आरोग्यदायी फॅट्स असतात. हा आहार शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो. ज्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते.

mediterranean diet benefits | saam tv

कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित करणं

दररोज घेतल्या जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण मध्यम पातळीवर कमी केल्याने शरीराचे वजन नियंत्रित राहतं. अभ्यासात सहभागी लोकांनी सुमारे 600 कॅलरीज कमी केल्या आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि अतिखाण्याची सवय कमी होते.

healthy eating for diabetes | saam tv

शारीरिक हालचाल

फक्त आहार बदल करून पुरेसा फायदा मिळत नाही, त्यासोबत व्यायाम आवश्यक असतो. नियमित चालणं, योग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यामुळे शरीर अधिक एक्टिव्ह राहतं. यामुळे साखर नियंत्रणाची प्रक्रिया सुधारतं.

weight management tips | saam tv

आहारात बदल

संपूर्ण धान्य आणि फायबरयुक्त आहार पचनसंस्था सुधारतो आणि साखर हळूहळू रक्तात मिसळते. यामुळे अचानक साखर वाढण्याचा धोका कमी होतो. हा आहार दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतो.

inflammation reducing foods | saam tv

Inflammation कमी करणारा आहार

प्रोसेस्ड आणि जंक फूड कमी केल्याने शरीरातील सूज कमी होते. सूज वाढल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

exercise for diabetes control | saam tv

वजन नियंत्रित ठेवणं

अतिरिक्त वजन हे मधुमेहाचा प्रमुख धोका मानला जातो. वजन कमी केल्याने शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. सतत वजन वाढ-घट टाळणे देखील महत्त्वाचे आहे.

lifestyle changes diabetes | saam tv

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

Poor Blood Circulation | saam tv
येथे क्लिक करा