Blood sugar saam tv
वेब स्टोरीज

Blood sugar: मधुमेही रूग्णांनी या ३ भाज्या जरूर खाव्यात; ब्लड शुगर राहील नियंत्रणात

कारलं, दुधी भोपळा आणि भेंडीसारख्या फायबरयुक्त भाज्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. मधुमेहींनी संतुलित आहारासह या भाज्यांचा समावेश करावा. मात्र डॉक्टरांनी सांगितलेले उपचार आणि जीवनशैलीचे पालन करणे तितकेच आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish
diabetes diet

मधुमेह

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहाराची योग्य निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. काही भाज्यांमध्ये भरपूर फायबर, पाणी आणि पोषक घटक असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते.

healthy vegetables

संतुलित आहार

या भाज्या संतुलित आहाराचा भाग म्हणून नियमित प्रमाणात खाल्ल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. मात्र केवळ भाज्या खाल्ल्याने मधुमेह बरा होत नाही, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेला उपचार आणि जीवनशैली यांचे पालन करणं आवश्यक आहे.

fiber rich foods

कारलं

कारलं ही मधुमेहींसाठी वरदान मानलं जातं. कारल्यामध्ये भरपूर फायबर असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे संतुलित आहारामध्ये कारल्याचा समावेश केल्यास ब्लड शुगर मॅनेज करण्यासाठी फायदा होऊ शकतो.

diabetic diet

कारल्यातील फायबर

कारल्यामध्ये असलेले फायबर अन्नाचं पचन आणि ग्लुकोजचं शोषण संथ गतीने होण्यास मदत करतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याची शक्यता कमी होऊ शकते. यामुळे ब्लड शुगर अधिक स्थिर ठेवण्यास मदत मिळते.

healthy eating

दुधी भोपळा

दुधी भोपळ्यामध्ये सुमारे ९२ टक्के पाणी आणि मुबलक फायबर असतं. ही भाजी हलकी, सहज पचणारी आणि कमी कॅलरीयुक्त असल्यामुळे मधुमेहींसाठी योग्य पर्याय मानली जाते. यामुळे रक्तातील साखरेचं नियंत्रण राखण्यास मदत होऊ शकते.

low calorie vegetables

ब्लड शुगरमध्ये वाढ होत नाही

दुधी भोपळ्यातील फायबर आणि पाण्याचं प्रमाण जेवणानंतर ग्लुकोजचं शोषण वेगाने करत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो. याच कारणामुळे ही भाजी मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त मानली जाते.

diabetes management

भेंडी

भेंडीमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरात ग्लुकोजचं शोषण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे संतुलित आहारात भेंडीचा समावेश केल्यास ब्लड शुगर मॅनेज करायला मदत होते.

healthy food

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Petrol diesel Rate today: US-इराण तणावाचा मोठा फटका! कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

8th Pay Commission : बेसिक सॅलरी १८ हजारांवरून थेट ७२ हजार होणार? प्रस्ताव नेमका कुणाचा,जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

सिल्की आणि शायनी केसांसाठी महागडे शॅम्पू नाही, केस धुण्याची 'जपानी स्टाईल' पद्धत फॉलो करा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 14200 रुपयांनी स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT