PCOS Diet : महिलांनो! PCOSच्या समस्येने त्रस्त आहात? हे पदार्थ खाणे टाळा, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Which diet is best for PCOS : PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा आजकाल महिलांमध्ये एक सामान्य आजार झाला आहे.
PCOS Diet
PCOS DietSaam Tv
Published On

What not to eat when you have PCOS : PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा आजकाल महिलांमध्ये एक सामान्य आजार झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी, तणाव, अनियमित मासिक पाळी यांमुळे महिलांमध्ये ही समस्या उद्भवते. 18 ते 45 वयोगटातील महिलांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो.

PCOS म्हणजे काय?

PCOS हा हार्मोनल आजार आहे. ज्या महिलांना (Women) दीर्घकाळ मासिक पाळी येत नाही. त्यांच्यात पीसीओएस असण्याची शक्यता असते. ही समस्या रजोनिवृत्तीपर्यंत टिकू शकते.

PCOS मुळे मधुमेह, रक्तदाब आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. PCOS मुळे अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर आणि शरीरावर केसांची जास्त वाढ आणि इतर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात.

PCOS Diet
Hormonal Drink For PCOS: अनियमित मासिक पाळीमुळे त्रस्त आहात? पीसीओएसची समस्या देखील आहे? हे हार्मोनल ड्रिंक नक्की ट्राय करुन पाहा

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, सुमारे 6 ते 12 टक्के स्त्रिया त्यांच्या बाळंतपणाच्या वर्षांमध्ये PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) मुळे प्रभावित होतात.

कोणत्याही आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार (Diet) महत्त्वाची भूमिका बजावतो . कारण ते तुमच्या शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा करतात, ज्यामुळे तुम्ही गंभीर आजारांपासून वाचाल. महिलांचे वजन वाढल्याने पीसीओएसचा धोका वाढू शकतो, त्यामुळे सकस आहार आणि व्यायामाच्या मदतीने तुम्ही वजन नियंत्रित करू शकता.

PCOS Diet
Women Suffering From PCOS : PCOS ने त्रस्त असलेल्या महिलांनी या पदार्थांचे सेवन करू नये...

PCOS मध्ये कोणते पदार्थ हानिकारक असू शकतात

तज्ज्ञांच्या मते, असे काही पदार्थ खाणे टाळावे. ज्यामुळे PCOS ची समस्या वाढू शकते. चला त्याबद्दल जाणून घेऊया...

  • तळलेले पदार्थ जसे की फ्रेंच फ्राईज, चिप्स आणि तळलेले चिकन (Chicken) किंवा मासे खाणे टाळा. या पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असतात.

  • चिप्स, मफिन्स, ब्रेड इत्यादी प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. याशिवाय चहा आणि सोडा जास्त पिणे टाळावे.

  • PCOS असल्यास पांढरे पीठ, पांढरा तांदूळ, चॉकलेट, पांढरा ब्रेड, बटाटे आणि पेस्ट्रीसारखे पदार्थ खाऊ नका.

  • परिष्कृत कर्बोदकांमधे शरीर अधिक इन्सुलिन तयार करते, ज्यामुळे मधुमेह होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com