Best Drink for PCOS: महिलांच्या मासिक पाळीचे चक्र हे साधारणत: २८ ते ३० दिवसांचे असते. अशातच जर मासिक पाळी काही कारणांमुळे चुकली तर आपल्याला अधिक टेन्शन येऊ लागते. यामध्ये काही महिलांना पीसीओएसचा देखील त्रास असतो. सध्या थायरॉइड (Thyroid), PCOD, PCOS, मेनोपॉज यांसारख्या मासिक पाळीच्या आजारांचे महिलांमध्ये वाढत चाललेले प्रमाण या गोष्टीचा पुरावा आहे.
भारतात (India) सुमारे 50 टक्के महिलांमध्ये अनियमित मासिक पाळीच्या समस्या जाणवतात ज्यांच्यावर उपचार न केल्याने 20 टक्के महिला PCOS सारख्या आजारांना सामोऱ्या जातात. जर तुम्हाला देखील अनियमित मासिक चक्र, मासिक पाळी (irregular Periods ) येण्यास उशीर होणे, मासिक पाळीचा कमी प्रवाह, पाळी दरम्यान वेदना, चेहऱ्यावर पुरळ, असामान्य वजनवाढ, गोळा येणे या समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्हाला हार्मोनल असंतुलन असू शकते.
या मागचे कारण तुमचे असंतुलित आहार चक्र, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, व्यायामाचा अभाव, कमी झोप, तणाव आणि अल्कोहोलचे अधिक सेवन इत्यादी गोष्टी असू शकतात. यावर आहारतज्ज्ञ आणि PCOS सल्लागार मोनाली मेहता यांनी उपायकारक असलेले 'हार्मोनल ड्रिंक' आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. जे तुमच्या मासिक पाळीच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास नक्कीच मदत करेल.
1. कसे बनवाल हार्मोनल ड्रिंक?
दालचिनी, मनुके आणि मेथीच्या दाण्यांपासून हे हार्मोनल ड्रिंक तयार केले जाते. हे ड्रिंक बनवण्यासाठी ग्लासभर पाण्यात दालचिनीचे 3 तुकडे, 5-6 मनुके आणि अर्धा चमचा मेथेच्या बिया रात्री पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यावे. 30-40 दिवस सकाळी उपाशी पोटी हे ड्रिंक प्यायल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
2. अनेक आवश्यक जीवनसत्त्वे पुरवते
मनुका आणि दालचिनीत असलेली जीवनसत्त्वे रात्रभर भिजत ठेवल्यामुळे पाण्यात विरघळतात व साखरेचे प्रमाण कमी करतात. या ड्रिंकमध्ये असलेल्या दालचिनी आणि मनुकांच्या जीवनसत्त्वांमुळे फक्त मासिक पाळीच्याच समस्यांवर नियंत्रण राहात नाही तर केसांच्या वाढीस मदत करते. त्वचा देखील सुधारते.
3. हार्मोनल ड्रिंकचे फायदे
हे हार्मोनल ड्रिंक शरीराला डिटॉक्स करते आणि रक्त शुद्ध करण्याचे काम करते. त्याच बरोबर अनियमित मासिक पाळी PCOS आणि मासिक पाळीच्या इतर समस्या जसे की मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गुठळ्या होणे इत्यादी समस्यांपासून वाचवते.
अॅनिमियाला रोखण्यास मदत करते. लाल रक्तपेशी वाढवणारे लोह, तांबे असलेल्या जीवनसत्त्वांचा पुरवठा करते. हृदयाचे आरोग्य सुधारते, कॉलेस्ट्रालला त्याच्या (LDL)अँटी-कॉलेस्ट्रालने कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका इत्यादी धोके टाळण्यास मदत करते. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते, डिटॉक्सिकेशन करते. यातील अँटी-एजींग गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ राहाते व चमकदार बनते. 'क' जीवनसत्त्वांमुळे मुरुमांपासून देखील त्त्वचेचा बचाव करते.
दालचिनीतील इंसुलिनच्या प्रवाहाचा वापर करून पेशींमध्ये ग्लूकोजचे प्रमाण वाढवून रक्तातील साखर कमी करून मधुमेहावर देखील नियंत्रण ठेवते. इंसुलिनची संवेदनशीलता वाढते ज्यामुळे इंसुलिनला ग्लूकोज पेशींपर्यत सहजपण पोहोचण्यास मदत होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.