AIIMS Report: डायपरमुळे किडनीला धोका? मूत्रमार्गात अडथळा निर्माण होण्याची भीती, एम्सचा धक्कादायक अहवाल

AIIMS Shocking Report Of Diapers: लहान मुलांचे कपडे खराब होऊ नयेत त्यांनी अंथरूण ओलं करू नये यासाठी आपण सर्रासपणे मुलांना डायपर घालतो. मात्र याच डायपरच्या वापराबाबत ही धक्कादायक बाब समोर आल्यानं सोशल मीडियात खळबळ उडालीय.
AIIMS  Report: डायपरमुळे किडनीला धोका?  मूत्रमार्गात अडथळा निर्माण होण्याची भीती, एम्सचा धक्कादायक अहवाल
AIIMS Shocking Report Of Diapers
Published On

तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी डायपर वापरत असाल तर ही बातमी आवर्जून तुमच्यासाठी. डायपरच्या वापरामुळे मुलांची किडनी खराब होऊ शकते असा एक धक्कादायक अहवाल सोशल मीडियात व्हायरल होतोय. दिल्ली एम्सच्या बालरोगतज्ज्ञ विभागनं हा अहवाल दिल्याचा दावा केला जातोय. लहान मुलांना शी-शूचा त्रास होऊ नये म्हणून पूर्वी लंगोटचा वापर केला जायचा. मात्र अलिकडच्या काळात लंगोटची जागा डायपरनं घेतली. अनेकजण आपल्या चिमुकल्यांना दररोज डायपर घालून निर्धास्त होतात.

मात्र हेच डायपर तुमच्या मुलांसाठी जीवघेणं ठरू शकतं. याबाबत दिल्ली एम्सच्या बालरोगतज्ज्ञ विभागानं एक धक्कादायक अहवाल दिलाय. या अहवालामुळे सोशल मीडियात एकच खळबळ उडालीय. डायपरच्या वापरामुळे मुलांची किडनी खराब होऊ शकते. डायपर टाईट असेल तर किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. एम्स रूग्णालयाच्या अहवालानुसार 300 पैकी एका मुलाच्या युरीनचा मार्ग कधीच सरळ नसतो. अशा मुलांवर सर्जरी करणं आवश्यक असतं. ज्याचा परिणाम थेट किडनीवर होऊ शकतो.

मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पालकवर्ग आपल्या मुलांसाठी सर्रासपणे डायपरचा वापर करताना दिसतायेत. विशेष म्हणजे जर्नल ऑफ एन्व्हार्यमेंटल ऑफ सायन्सनमधून डिस्पोजिबल डायपरबाबत यापूर्वीही इशारा देण्यात आला होता.

डायपर की जीवाशी खेळ?

डिस्पोजिबल डायपरमुळे छोट्या मुलांचं लिव्हर खराब होऊ शकतं. त्यांना त्वचेचे आजार होऊ शकतात. डिस्पोजिल डायपरमध्ये प्रतिबंधित रसायन थॅलेटचा वापर होतो. त्यामुळे मुलांना हार्मोन्ससंबंधित विकार होऊ शकतात.

मुळात डायपर खरेदी करताना त्याची किंमत आणि मल-मूत्र शोषण करण्याची क्षमता या दोन गोष्टींवरच भर दिला जातो. यावरूनच तज्ज्ञांनी पालकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.डायपर दिवसातून किती वेळा बदलण्यात यावं, बाळाला ते घट्ट होतंय का? किंवा बाळ कोणत्या मार्गानं शी-सू करतंय या गोष्टींबाबत पालकांना काहीच माहिती नसते. केवळ स्वत:चा त्रास टाळण्यासाठी ते डायपरच्या वापरावर भर देतात. मात्र ही तात्पुरती सोय त्यांच्या मुलांच्या जिवावरही उठू शकते.

AIIMS  Report: डायपरमुळे किडनीला धोका?  मूत्रमार्गात अडथळा निर्माण होण्याची भीती, एम्सचा धक्कादायक अहवाल
Oil and Shampoo Applying Tips : केसांना आठवड्यातून किती वेळा तेल लावलं पाहिजे आणि शॅम्पू केलं पाहिजे? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com