Adhik maas 2023 : अधिक मासात तब्बल ३० वर्षांनी जुळून आला खप्पर योग ! या 5 राशींवर येणार मोठे संकट, गुंतवणूक करणे टाळा

Khappar Yoga : मकर राशीतील सूर्य-शुक्र यांचा संयोग आणि त्रिकोणाचा अधिपती असलेल्या मूळ त्रिकोणाच्या स्थानामुळे खप्पर योग तयार होत आहे
Adhik maas 2023
Adhik maas 2023Saam Tv
Published On

Shravan Rashifal 2023 : अधिकमासला मलमास किंवा पुरुषोत्त्म महिना म्हणूनही ओळखले जाते. सध्या श्रावण हा मास सुरु झाला आहे. यंदा हा श्रावण हा ५९ दिवसांचा आहे. 18 जुलैपासून सुरू झाला असून तो 16 ऑगस्ट रोजी संपेल.

ज्योतिषशास्त्रानुसार अधिक महिन्यात विष्णूची पूजा केली जाते. तसेच या काळात अनेक ग्रहांचे संक्रमण होमार आहे. शुक्र व शनिच्या वक्रीमुळे तब्बल ३० वर्षानंतर खप्पर योग तयार झाला आहे. मकर राशीतील सूर्य-शुक्र यांचा संयोग आणि त्रिकोणाचा अधिपती असलेल्या मूळ त्रिकोणाच्या स्थानामुळे खप्पर योग तयार होत आहे. ज्याचा अशुभ परिणाम कोणत्या या ५ राशींवर होणार आहे हे जाणून घेऊया सविस्तर

Adhik maas 2023
Shravan Rashibhavishya 2023 : श्रावणात राशींनुसार करा हे उपाय, होईल महादेवाची कृपा

1. मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी खप्पर योग अशुभ परिणाम देईल. कामाच्या (Job) ठिकाणी ताण वाढू शकतो. जोडीदाराशी (Partner) मतभेद होतील ज्यामुळे वैवाहिक जीवन अडचणींनी भरलेले असेल. या महिन्यात गुंतवणूक करणे टाळा. धनहानी होण्याची दाट शक्यता आहे.

2. कर्क

अधिक मासामुळे खर्च वाढतील, त्यामुळे कर्ज घ्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात सदस्यांशी वाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत समन्वयाचा अभाव राहील. मुलांचे आरोग्य (Health) बिघडू शकते, त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतील. अधिकमासात शुभ कार्य करु नका

Adhik maas 2023
Weekly Rashi Bhavishya In Marathi: श्रावण महिना सुरु होताच 'या' राशींचं नशीब फळफळणारं; तुम्ही यात आहात का?

3. कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी खप्पर योग त्रासदायक ठरेल. या काळात खर्चात सतत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कामावर लक्ष केंद्रित करा, अनावश्यक गोष्टी टाळा. या काळात मालमत्तेचा वादही होऊ शकतो.

4. वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खापर योगामुळे अनेक अडचणी येतील. व्यावसायिकांना व्यवसायात स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. या दरम्यान सरकारी नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

Adhik maas 2023
Vastu Tips : घरात शंकराची मूर्ती आणत असाल तर हे नियम लक्षात ठेवाच !

5. मीन

मीन राशीच्या लोकांसाठी खप्पर योगाचा काळ अडचणींचा असेल. तुमच्याविरुद्ध कोर्टात केस सुरू असेल तर ती लांबण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च वाढतील, कर्ज घेण्याची परिस्थिती येऊ शकते. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com