कोमल दामुद्रे
यंदाच्या श्रावणात काही विशेष योग तयार होत असल्यानं याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.
या महिन्यात राशींनुसार काही उपाय केल्यास शंकराची आपल्याला कृपा राहील जाणून घेऊया त्याबद्दल
श्रावणात सोमवारी व्रत केल्यास ते तुमच्यासाठी फलदायी ठरेल. या दिवशी तुम्हाला विधीपूर्वक उपवास करावा लागेल आणि शिवाची पूजा करावी लागेल
श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शक्य असल्यास 11 बेलपत्रात ऊँ नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे. सर्व समस्या दूर होतील.
या संपूर्ण महिन्यात शिवाची भक्ती करा आणि शिव चालिसाचे पठण केल्याने मन आणि मेंदूचे तणाव दूर होतील.
श्रावणामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करताना भगवान शिवाला जल अर्पण करा, सर्व संकटांपासून मुक्ती मिळू शकते.
या महिन्यात भगवान शंकराला आंब्याचा रस अर्पण करा आणि त्यासोबत महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
कोणतीही मोठी समस्या टाळण्यासाठी तुम्ही शिव आणि पार्वतीचा जलाभिषेक करावा, या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
श्रावण महिन्यात भोलेनाथाला पाणी, भस्म आणि पांढरे चंदन अर्पण केल्यास लाभ होईल.
श्रावणामध्ये पाणी आणि काळे तीळ घालून भगवान शिवाचा जलाभिषेक करावा आणि दररोज शक्य नसल्यास सोमवारी शिवलिंगाचा जलाभिषेक करावा.
श्रावणात भगवान शिवाचा अभिषेक आपल्या क्षमतेनुसार म्हणजेच पाण्याव्यतिरिक्त कच्चे दूध आणि मधाने अभिषेक केल्यास विशेष फायदा होतो.
श्रावण महिन्यात हनुमान चालिसाचा पाठ करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.
शंकराला पाण्यात मध मिसळून अर्पण करण्यासोबतच शिव चालिसाचा पाठ करण्याचा सल्ला दिला जातो.
श्रावण महिन्यात भगवान शंकराला पाण्यात मध, अष्टगंध आणि तीळ घालून अर्पण करा आणि रुद्राष्टक पाठ करा, तुम्हाला त्याचे फायदे होतील.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.