अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी; पाहा गोळी शरीरात घुसल्यानंतर नेमकं काय-काय होतं?

Govinda Injured From Bullet: नुकतंच बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या पायावर चुकून पायावर गोळी झाडली गेली. मात्र एखाद्या व्यक्तीवर गोळी झाडल्यानंतर ती शरीरात घुसल्यानंतर काय होतं ते जाणून घेऊया.
Injured From Bullet
Injured From Bulletsaam tv
Published On

नुकतंच दोन दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्यासोबत एक मोठी घटना घडली. लायसेंस रिवॉल्वर साफ करत असताना चुकून गोविंदाच्या पायावर गोळी झाडली गेली. या घटनेनंतर गोविंदाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र एखाद्या व्यक्तीवर गोळी झाडल्यानंतर ती शरीरात घुसल्यानंतर काय होतं, हा प्रश्न तुमच्या मनात असेल.

शरीरात गोळी लागल्यावर नेमकं काय होतं?

जर एखाद्या व्यक्तीला गोळी लागलीये आणि त्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळाले नाहीत तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. गोळी झाडली की, त्या व्यक्तीला गंभीर दुखापत होते. याचं कारण म्हणजे, गोळीचा वेग आणि दाब. या दोन्ही गोष्टींमुळे शरीराला इजा होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, गोळी शरीराला कितपत दुखापत करते हे गोळी शरीराच्या कोणत्या भागाला आणि कोणत्या अवयवाला लागलीये यावर अवलंबून असतं.

Injured From Bullet
Symptoms Of Low Platelets Count: डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणं ठरू शकतं जीवघेणं; 'ही' लक्षणं दिसल्यास व्हा अलर्ट

गोळी लागल्यानंतर मृत्यूचा धोका कधी असतो?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, व्यक्तीला गोळी लागल्यानंतर ती ज्या ठिकाणी लागली आहे त्या ठिकाणी रक्तस्राव होतो. अशावेळी व्यक्तीच्या शरीरातील अधिक प्रमाणात रक्त वाहून गेल्यामुळे आणि त्यामध्ये असलेल्या दारूमुळे इंफेक्शन होतं. ज्यावेळी गोळी शरीरात शिरते तेव्हा ती अनेक अवयव, पेशी, ऊती आणि रक्तवाहिन्यांचं नुकसान करते. जर हे नुकसान जास्त असेल तर दहा मिनिटांत व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका असतो.

कोणत्या अवयवांवर गोळी लागणं असतं धोकादायक

हात, पाय, मांडी या शरीराच्या भागावर गोळी घातल्यास मृत्यूची शक्यता कमी असते. यामध्ये गोळी रक्तवाहिन्या, स्नायू आणि ऊतींना नुकसान करतं. मात्र त्यावर उपचार करणं शक्य आहे. परंतु गोळी पोटासारख्या महत्त्वाच्या अवयवाला लागली तर त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. पोटात गोळी लागली की किडनी, यकृत आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. असावेळी संबंधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

हृदयात गोळी लागल्यानंतर किती वेळात मृत्यू संभवतो?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदय किंवा मेंदूला म्हणजेच डोक्यात गोळी लागली तर रूग्णाचा मृत्यू संभवतो. जर गोळी हृदयात लागली तर काही मिनिटांतच माणसाचा जीव जाऊ शकतो. शरीराच्या कोणत्या भागावर गोळी लागली आणि गोळी लागल्यावर होणाऱ्या रक्ताच्या प्रवाहावर हे अवलंबून आहे.

Injured From Bullet
Medicine Avoid With Milk : दूधासोबत कोणती औषधं घेणं टाळलं पाहिजे? हे आहे अचूक उत्तर!

गोळी झाडल्यानंतर दारूमध्ये असणारं विष हळूहळू शरीरात पसरतं. गोळी कोणत्याही महत्त्वाच्या अवयवाला लागली नसेल, तर काही तासांत उपचार मिळाल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. पण गोळी झाडल्यानंतर रक्तस्त्राव थांबला नाही, तर महत्त्वाच्या नसलेल्या अवयवाला लागलेल्या गोळीनेही रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com