
ग्लोबल हेल्थकेअर कंपनी अबॉटने कंपनीच्या 'अबॉट फंड' या लोकहितकारी प्रतिष्ठानाच्या पाठबळाने Future Well™ किड्स प्रोग्राम सुरू केला आहे. माध्यमिक इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी (१०-१३ वर्षे) टाइप २ डायबेटिस आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांसारख्या दीर्घकालीन आजारांमागच्या कारणांची माहिती करून घ्यावी आणि अधिक आरोग्यदायी सवयी लावून घ्यावात, यासाठी त्यांना शिक्षित आणि प्रेरित करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
भारतामध्ये समाजाच्या वंचित स्तरातील पाच शाळांना घेऊन या कार्यक्रमाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. या शाळांतील मुलांना शिक्षित करण्यासाठी व तेथील शिक्षकांना पाठबळ पुरविण्यासाठी अबॉटचे कर्मचारी या शाळांत शारीरिक स्वास्थ्य, पोषण आणि निरोगी जीवनशैलीविषयीची माहिती देणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम स्वेच्छेने करत आहेत.
या अभ्यासक्रमात अंतर्भूत विषयांच्या आखणीसाठी अबॉट फंडने प्रत्येक इयत्तेला साजेसे डिजिटल अभ्यासक्रम बनविण्याच्या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावरील अग्रगण्य संस्था मानल्या जाणाऱ्या डिजिटल एज्युकेशन या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहितीनिशी निर्णय घ्यावेत व आपल्या आरोग्याविषयीचे निर्णय आपल्या हातात घ्यावेत यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रात्यक्षिकांवर आधारित व संवादात्मक अभ्याससत्रे उपलब्ध करून दिली जातात. याखेरीज त्यांनी आरोग्याशी जोडलेल्या भ्रामक कल्पना कोणत्या हे ओळखून स्वत:साठी फिटनेसची लक्ष्ये निर्धारित करावीत यासाठीही त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
अबॉट इंडियाच्या प्रांतीय HR डिरेक्टर दीपशिखा मुखर्जी म्हणाल्या, “भारतावर असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या भाराचा प्रश्न हाती घेत असताना मुलांना आरोग्याविषयीची अत्यावश्यक माहिती सारख्याच प्रकारे प्राप्त होणे महत्त्वाचे आहे. यासाठीच अबॉटने Future Well™ किड्स प्रोग्रामची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांनी अधिक चांगले भविष्य घडविण्यासाठी स्मार्ट, आरोग्याचे भान राखणारे निर्णय घ्यावेत यासाठी त्यांना शिक्षित आणि प्रेरित करणे हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे.”
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारतामध्ये हृदयविकार आणि टाइप २ डायबेटिस यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे (noncommunicable diseases - NCDs) उद्भवणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ढोबळमानाने ६३% आहे आणि त्यांचा प्रादूर्भाव वाढत आहे. आरोग्यास अपायकारक आहार, शारीरिक सक्रियतेचा अभाव आणि तंबाखू व अल्कोहोलचे अतिरेकी सेवन यांसारख्या काही वर्तणुकीशी संबंधित सामायिक धोकादायक बाबी या आजारांना कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.
आपल्याला NCDs च्या दिशेने लोटणाऱ्या अनेक सवयी बरेचदा लहानपणीच सुरू होतात. जगभरात ८१% किशोरवयीन मुलांच्या शारीरिक क्रियाकलाप पुरेशा प्रमाणात नाहीत. भारतातील जवळ-जवळ ७४% किशोरवयीन मुलांच्या ‘शारीरिक क्रियाकलाप अपुऱ्या’ असल्याचे व त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे, असे २०१६ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीतून आले होते.
मुलांच्या आरोग्यासंबंधी वर्तणुकींविषयी त्यांना शिक्षित करणे महत्त्वाचे आहे. फ्युचर किड किड्स प्रोग्राम हेच धडे वर्गावर्गांत पोहोचवितो, ज्यात NCDs विषयीच्या माहितीबरोबरच चांगले पोषण, फिटनेस आणि आरोग्यपूर्ण सवयी यांबद्दलच्या माहितीचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी दीर्घकालीन आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि आयुष्यभर पुरतील अशा आरोग्यपूर्ण सवयींचा स्वीकार करण्यासाठी साधे उपाय हाती घ्यावेत यासाठी त्यांना प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी चांगल्या पोषणाविषयी आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी शिकतात त्याचबरोबर अशा आरोग्यपूर्ण सवयी त्यांच्या आरोग्य व स्वास्थ्यासाठी इतक्या महत्त्वाच्या का आहेत हेही त्यांना सांगितले जाते. निरोगी सवयी विकसित करण्यासाठी कृती करणे गरजेचे असल्याने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात साधेसुधे बदल करून आपल्या आयुष्याची सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याची प्रेरणा देतो. उदाहरणार्थ, स्वत:साठी पोषक आहाराचे नियोजन करणे, फिटनेसची लक्ष्ये आखणे आणि पोषणाविषयीचे भरीव सल्ले व ऑनलाइन हेल्थ फॅड्स यांच्यामध्ये फरक करण्यास शिकणे.
भारतातील सुरुवातीनंतर अबॉट आणि अबॉट फंडच्या फ्युचर वेल किड्स प्रोग्राम आता सहा देशांतील शाळांत कार्यरत आहे, ज्यात कोलंबिया, आयर्लंड, मेक्सिको, यू.के आणि यू. एस. या देशांच समावेश आहे. २०१९ पासून हा कार्यक्रम आपल्या पार्टनर शाळांतील जवळ-जवळ ५,५०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. अबॉटने Future Well™ मुलांसाठीचा अभ्यासक्रम आपल्या रिअल मद्रिद फाउंडेशनशी असलेल्या भागीदारीमध्येही अंतर्भूत केला आहे, ज्याद्वारे १० देशांतील १०,००० हून अधिक मुलांना ३५,००० हून अधिक तासांचे शिक्षण दिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.