Beed Holi News : होळी म्हटलं की, सर्वत्र त्याची धामधूम असते. गावी या दिवशी पालखी, मिरवणूक निघते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी मोठ्या उत्सहात खेळली जाते. हा सण जवजवळ पाच दिवस खेळला जातो.
परंपरा जपण्यासाठी व जावयाच्या शोधासाठी जावई शोध समिती स्थापन करण्यात आली असून जावयाचा शोध सुरु आहे. गाढवावरुन मिरवणूकीच्या भीतीने गावातील जवळपास 200 जावई हे पळून गेल्याचे समोर आले त्यामुळे यंदा कोणत्या जावयाची मिरवणूक निघणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
परंपरा कायम ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस अगोदर गावातील तरुण एकत्र येऊन जावई शोध समिती नेमतात. एका जावयास ताब्यात घेऊन धुळवडीपर्यत निगरानीखाली ठेवले जाते.
धुळवडीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीसमोर गाढव आणून चपलेचा हार घालून मिरवणुकीला सुरू होते. गावातील प्रमुख रस्त्यांवरून दुपारपर्यंत मिरवणूक हनुमान मंदिरासमोर पोहोचते. या ठिकाणी लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते जावयाला दिला जातो. शिवाय जावईबापूला सासऱ्याच्या ऐपतीनुसार सोन्याची अंगठी देखील भेट दिली जाते.दरम्यान या विडेकरांच्या अनोख्या परंपरेची प्रत्येकांला एकप्रकारे प्रतीक्षा लागलेली असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.