Liver Disease : वेळीच व्हा सावध! त्वचेवरील ही लक्षणं लिव्हर खराब होण्याचं देतात संकेत, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Liver Disease Symptoms: त्वचेवर दिसणारे बदल लिव्हरच्या गंभीर समस्यांचे लक्षण असू शकतात. या ५ लक्षणांवर लक्ष ठेवा, वेळेत उपचार करा आणि लिव्हरचे आरोग्य सुरक्षित ठेवा.
Liver Disease Symptoms
Liver Diseasegoogle
Published On

लिव्हर खराब होण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कारण लिव्हरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे फार कठीण असते. कारण या आजाराच्या सुरुवातीला लक्षणे न शरीराच्या बाहेर दिसत नाहीत. मात्र, तुमच्या त्वचेवर दिसणाऱ्या काही बदलांनी लिव्हरमधील गंभीर समस्या आधीच दिसायला सुरुवात होते. पुढे आपण हातावर दिसणाऱ्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत.

१. त्वचा आणि डोळ्यांचा पिवळसर रंग

जर तुमच्या त्वचेचा आणि डोळ्यांचा पिवळसर रंग असेल तर याचा परिणाम लिव्हरवर होत असतो. लिव्हरच्या कार्यात अडचण असल्याचे सर्वात प्रसिद्ध आणि स्पष्ट लक्षण आहे. जेव्हा लिव्हर बिलीरुबिन म्हणजे लाल रक्तपेशींचा विघटन झाल्यानंतर होणारा पिवळा रंग व्यवस्थित प्रक्रियेत येत नाही, तेव्हा रक्तात साचत जातो. यामुळे त्वचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या रंगाचा भाग पिवळसर रंगाचा होतो. जत्ज्ञांच्या मते, जॉन्डिस दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे, कारण हे हॅपेटायटिस, पित्तनलिकेतील अडथळा किंवा लिव्हर खराब होण्याची लक्षणे असू शकतात.

Liver Disease Symptoms
Liver Disease Symptoms: ही ७ लक्षणं असतील तर वेळीच सावध व्हा, अन्यथा लिव्हर खराब झाले म्हणूनच समजा, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

२. त्वचेवरील नसा ठळक दिसणे (स्पायडर अँजिओमास)

स्पायडर अँजिओमास म्हणजे लहान, लाल, जाळीसारख्या नसांचे गट, जे चेहऱ्यावर, मानेवर, छाती किंवा वरच्या हातांवर दिसतात. हे लिव्हरच्या हॉर्मोनला योग्यरीत्या प्रक्रिया करू शकत नसल्यामुळे इस्ट्रोजेन वाढल्याचे लक्षण असते. सतत दिसणाऱ्या किंवा अचानक दिसणाऱ्या या लक्षणांवर दुर्लक्ष करू नका. हे सिरॉसिस, अल्कोहॉलिक लिव्हर रोग किंवा व्हायरल हॅपेटायटिस संकेत असू शकते.

३. पातळ हातांच्या स्कीनवर लालसरपणा (पामर एरिथेमा)

पामर एरिथेमा म्हणजे हाताच्या स्कीनवर, विशेषतः अंगठा आणि छोटे बोटाच्या तळभागात सतत लालसरपणा दिसतो. लिव्हर खराब झाल्यामुळे रक्तवाहिन्यांचे प्रवाह बदलतात आणि हार्मोनल असंतुलन होते. हा लालसरपणा उष्णतेमुळे किंवा इतर कारणाने होतो असे गृहीत धरून दुर्लक्ष करू नका. हे लक्षण सिरॉसिस, फॅटी लिव्हर, ऑटोइम्यून हॅपेटायटिस या रोगांशी संबंधित असू शकते.

४. सतत खाज येणे

विशेषतः रात्री जास्त खाज येणे आणि त्वचेवर फोड्या नसताना खाज येणे हे लिव्हरच्या कार्यातील गंभीर लक्षण असू शकते. लिव्हरमध्ये बाइल अ‍ॅसिड्स रक्तात साचतात, ज्यामुळे शरीराला खाज सुटते. हा प्रकार हात, पाय आणि अंगांवर जाणवतो. त्यामुळे त्वचेवर सतत खाज सुटत असेल तर वेळीच उपचार सुरु करा. कारण हे पित्तनलिका किंवा लिव्हर निकामी झाल्याचे संकेत असू शकते.

५. त्वचेवर गडद ठळक डाग (हायपरपिग्मेंटेशन)

त्वचेवर जास्त गडद किंवा ठळक डाग दिसणे, डोळे, तोंड आणि काखेत जास्त डाग असतील तर हे लिव्हरचे लक्षण असू शकते. यामागे हार्मोनल असंतुलन, इन्सुलिन रेसिस्टन्स किंवा मेलानिन वाढ यांचा प्रभाव असतो. या प्रकारच्या डागांमध्ये अचानक बदल किंवा वाढ दिसल्यास, विशेषतः इतर लक्षणांसह, त्वरित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

Liver Disease Symptoms
Cancer India: जगात कॅन्सर कमी; भारतात मात्र वाढ! तज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com