Covid -19 पासून बचाव करायचाय? तर लाइफस्टाइलमध्ये करा पदार्थांचा समावेश, Immunity राहिल Strong

5 immunity boosters to help keep you healthy amid COVID- 19 : कोविड-१९ च्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण हे ६०० च्या वर गेले आहे. त्यामुळे कोविडची वाढती प्रकरणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्याबरोबरच आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अधिक महत्त्वाचे आहे.
Covid -19
Covid -19Saam Tv
Published On

Immunity Booster Food :

देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाला याबाबत काळजी वाटू लागली आहे. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे.

कोविड-१९ च्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण हे ६०० च्या वर गेले आहे. त्यामुळे कोविडची वाढती प्रकरणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्यामुळे या आजाराला (Disease) प्रतिबंध करण्याबरोबरच आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अधिक महत्त्वाचे आहे. काही पदार्थांचे सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते.

या खाद्यपदार्थांना आपल्या आहाराचा भाग बनवल्यास केवळ कोरोनापासून नाही तर सर्दी, खोकला आणि ताप यापासून संरक्षण होईल. जाणून घेऊया कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

1. व्हिटॅमिन सी

लिंबूवर्गीय फळांमध्ये संत्री, लिंबू, द्राक्षे, मोसंबी यांसारखे आंबट गोड चवीच्या फळांचा समावेश होतो. यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होईल. त्यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सि़डंट्स फ्री रॅडिकल्समुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.

Covid -19
Exercise Of Cold Weather : हिवाळ्यात फिट राहाण्यासाठी व्यायाम करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

2. किवी

किवी ही आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानली जाते. यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळते. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत करते. त्यामुळे याचा आहारात समावेश करा.

3. फॅटी फिश

ओमेगा -३ फॅटी अॅसिड्समध्ये ट्यूना, मॅकरेल, सार्डिन इत्यादी फॅटी माशांमध्ये आढळतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल.

Covid -19
Heart Attack Reason : तरुणांमध्ये वाढतेय हार्ट अटॅकचे प्रमाण, या सवयी आजपासून बदलाच

4. लसूण

स्वयंपाकघरातील बहुगुणी लसूण हा आरोग्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. यामध्ये दाहक-विरोधी घटक आढळतात. ज्यामुळे जळजळ कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळतात.

5. पालक

पालकमध्ये फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई सारखे अनेक खनिजे आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होईल. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com