Exercise Of Cold Weather : हिवाळ्यात फिट राहाण्यासाठी व्यायाम करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

Tips for Exercising Safely During Cold Weather : हिवाळा म्हटलं की, व्यायाम करताना आपल्याला आळस येतो. त्यामुळे अनेकदा आपण फिटनेसकडे दुर्लक्ष करतो. व्यायाम असो किंवा योग करणे आपण टाळतो.
Exercise Of Cold Weather
Exercise Of Cold WeatherSaam Tv
Published On

How Cold Weather Affects the Body During Exercise :

हिवाळा म्हटलं की, व्यायाम करताना आपल्याला आळस येतो. त्यामुळे अनेकदा आपण फिटनेसकडे दुर्लक्ष करतो. व्यायाम असो किंवा योग करणे आपण टाळतो. असे अनेक लोक आहेत जे हिवाळ्यात देखील त्यांच्या शारीरिक आरोग्याबाबत अधिक सक्रिय असतात.

हिवाळ्यात धावताना किंवा व्यायाम करताना काही गोष्टींची काळजी (Care) घेणे खूप गरजेचे आहे. कोणतीही शारीरिक समस्या आल्यानंतर शरीर आपल्याला सिग्नल देते. अशावेळी आपण शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. व्यायाम करताना शरीराच्या कोणत्याही भागात क्रॅम्प आला तर फिटनेस सल्लागार किंवा डॉक्टारांचा सल्ला घ्या. त्यामुळे हिवाळ्यात (Winter Season) सकाळी धावताना किंवा व्यायाम करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

1. वॉर्म अप

कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना वॉर्म अप महत्त्वाचा आहे. हिवाळ्यात वातावरणातील गारव्यामुळे शरीरातील स्नायू घट्ट होतात. ज्यामुळे ताण (Stress) आणि दुखापत होण्याचा धोका वाढतो. तुमचे हृदय आणि शरीर अॅक्टिव्ह स्थितीत यावे यासाठी वॉर्म अप महत्त्वाचे आहे.

Exercise Of Cold Weather
Heart Attack Reason : तरुणांमध्ये वाढतेय हार्ट अटॅकचे प्रमाण, या सवयी आजपासून बदलाच

2. कपडेदेखील महत्त्वाचे

व्यायाम करताना आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतो हे देखील ठरवायला हवे. शरीर उबदार राहिल आणि आतून ओलावा शोषून घेणारे कपडे घालणे महत्त्वाचे आहे. यासोबतच वॉटरप्रूफ किंवा विंडप्रूफ जॅकेट घाला.

3. हात पाय सुरक्षित ठेवा

थंड हवामानात धावताना किंवा व्यायाम करताना हातात हातमोजे आणि थर्मल सॉक्स आणि पायात शूज घाला. ज्यामुळे तुमचे हात आणि पाय उबदार राहातील. यासोबत कान झाकण्यासाठी टोपी घाला.

Exercise Of Cold Weather
Anxiety Attack आल्यानंतर काय कराल? या ५ सोप्या टिप्स येतील कामी

4. हायड्रेट राहा

हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्यामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या अधिक जाणवते. थंड वातावरणात व्यायाम केल्याने शरीर डिहायड्रेट होऊ शकते. अशावेळी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com