Anxiety Attack आल्यानंतर काय कराल? या ५ सोप्या टिप्स येतील कामी

Mental Health : झपाट्याने बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुण अधिक प्रमाणात शारीरिक आणि मानसिक समस्यांना बळी पडत आहे. एकाच गोष्टीचा वारंवार विचार केल्याने आपले डोके दुखू लागते.
Anxiety Attack
Anxiety AttackSaam Tv
Published On

How To Deal Anxiety :

झपाट्याने बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुण अधिक प्रमाणात शारीरिक आणि मानसिक समस्यांना बळी पडत आहे. एकाच गोष्टीचा वारंवार विचार केल्याने आपले डोके दुखू लागते. अधिकचा ताण घेतल्याने आपले डोके जड होऊन घाम फुटू लागतो. अशा वेळी आपले हृदय अधिक वेगाने धडधडू लागते.

सध्याच्या पिढीमध्ये मानसिक ताण (Mental Stress) आणि चिंता ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तणाव (Stress) घेणे ही सामान्य स्थिती असली तरी अधिक प्रमाणात वाढल्याने ती तीव्र होते यामुळे फिट येणे, घाबरणे, भीती वाटणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

चिंता अनेक गोष्टींशी संबंधित असून यामुळे स्नायूंवर ताण येणे, अस्वस्थता जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, एकटेपणा जाणवणे, कामात लक्ष न लागणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा ही समस्या अधिक प्रमाणात वाढू लागते. तेव्हा या ५ टीप्स (Tips) फॉलो करा.

1. व्यायाम करा

जर तुमच्या डोक्यात एखाद्या गोष्टीचा विचार येत असेल तर किंवा एन्झायटी अटॅक येत असेल तुम्ही जोरजोरात श्वास घेऊ शकता. एखाद्या गोष्टीमुळे तुमचे मन आणि शरीर शांत करण्यासाठी श्वास घ्या. नाकातून हळूहळू श्वास घेणे आणि काही सेकंद तुमचा श्वास रोखून ठेवणे नंतर तोंडातून श्वास सोडणे असे केल्यास तुम्हाला फायदा होईल.

Anxiety Attack
Heart Attack Reason : तरुणांमध्ये वाढतेय हार्ट अटॅकचे प्रमाण, या सवयी आजपासून बदलाच

2. लक्षणे

एन्झायटी अटॅकमध्ये शारीरिक आणि भावनिक लक्षणे असू शकतात. ज्यात हृदयाचे ठोके जलद होतात, घाम येणे, थरथरणे, धाप लागणे, दु:ख किंवा स्वत:वरचे नियंत्रण सुटू शकतो.

3. नकारात्मक विचार

बरेचदा एन्झायटीमुळे आपल्या डोक्यात आणि मनात नकारात्मक विचार येतो. यावेळी तुमच्या डोक्यात वाईट गोष्टी फिरु लागतात. अशावेळी तुमचे लक्ष वळवण्याच्या प्रयत्न करा. सकारात्मक गोष्टींवर तुमचे लक्ष केंद्रित करा. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

Anxiety Attack
Women Health Tips : नव मातांच्या स्तनात आढळणारा 'रस्टी पाईप सिंड्रोम' नेमका काय? याची लक्षणे कोणती? बाळावर कसा होतो परिणाम

4. विश्रांती घ्या

जर तुम्हाला सतत चिंता वाटत असेल. कामातून काही वेळ विश्रांती घ्या. तसेच तुम्ही शॉवर, योगाभ्यास करा, गाणी ऐका, पुस्तके वाचा. तसेच स्वत:चे लक्ष विचलित करण्यसाठी व्यायाम करा.

5. जवळच्या व्यक्तीकडून मदत मागा

जेव्हा तुम्ही सतत चिंतेत असता तेव्हा तुम्ही जवळच्या व्यक्तीसोबत बोला. त्याची मदत घ्या. कोणाकडूनही मदत मागताना संकोचू नका. कुटुंबातील व्यक्तीशी, मित्राशी किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com