Diwali 2025: दिवाळीतील ४ शुभ मुहूर्त अजिबात चुकवू नका, अन्यथा...; पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली महत्वाची माहिती

Shubh Muhurats: दिवाळी २०२५ साठी पंचांगतज्ज्ञ मोहन दाते यांनी सांगितलेले ४ शुभ मुहूर्त नरक चतुर्थी, अमावस्या, पाडवा आणि भाऊबीज. सणाची योजना, पूजा आणि खरेदीसाठी हा मार्गदर्शक उपयोगी आहे.
Diwali Muhurat 2025
Auspicious Muhuratsgoogle
Published On

दिवाळी हा सण भारतात मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. दिवाळी या सणामध्ये इतर सणांचा ही समावेश असतो. पुढे आपण ज्योतिषतज्ज्ञ पंचागकर्ते मोहन दाते यांनी प्रसार माध्यमांवर सांगितलेले सगळ्या सणांचे शुभ मुहूर्त जाणून घेणार आहोत.

येत्या २० ऑक्टोबर २०२५ रोजी नरक चतुर्थीचे पहिले अभ्यंगस्नान असणार आहे. हे स्नान सुर्योदयापुर्वी करावे. कारण हा प्रातक काळ खूप महत्वाचा मानला जाणार आहे. पुढच्या दिवशी अमावस्या असणार आहे. सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंतच्या काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. याची पंचांगानुसार तारिख म्हणजे २१ ऑक्टोबर २०२५ आहे.

Diwali Muhurat 2025
Saturday Horoscope: धनत्रयोदशीला 4 राशींचे भाग्य उजळणार, कामाच्या ठिकाणी बढतीचे योग, वाचा शनिवारचे राशीभविष्य

साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस म्हणजे पाडव्याचा दिवस आहे. यंदा पाडवा २२ ऑक्टोबरला असणार आहे. या शुभ दिनी तुम्ही वाहन खरेदी, नवीन वस्तुंची, दागिन्यांची खरेदी, कपड्यांची खरेदी करु शकता. तसेच हा दिवस लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे. तसेच नवऱ्याकडून भेट वस्तू देखील घ्यावी, हा त्यांचा हक्क आहे.

23 ऑक्टोबरला भाऊबीज असणार आहे. हा भावा बहिणीच्या नात्याचा अत्यंत महत्वाचा दिवस असणार आहे. यादिवशी बहीणीने भावाला ओवाळून त्याच्याकडून गिफ्ट घ्यायचे आहे. तर भावानेही बहीणीच्या हातचे जेवणे खायचे आहे. हा दिवस आनंदात घालवायचा प्रयत्न केला पाहिजे. सामाजिक सलोखा जपणारा हा सण सगळ्यांनी आनंदात केला पाहिजे. तसेच ही महत्वाची माहिती लक्षात घेणे सुद्धा आवश्यक आहे.

Diwali Muhurat 2025
Diwali 2025: फराळ नरम पडतोय? मग सोप्या टिप्स लगेचच करा फॉलो, महिनाभर टिकतील चकल्या अन् चिवडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com