Sakshi Sunil Jadhav
दिवाळी आणि सणासुदीच्या वेळी फराळ तयार करणे आणि त्याला ताजेतवाने ठेवणे ही गृहीणींसाठी तारेवरची कसरत असते. आता टेन्शन सोडा.
फराळ नरम पडू नये आणि चव टिकावी यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करता येतात.
फराळ स्टोअर करताना सर्व भांडी स्वच्छ व कोरडे ठेवा. मग त्यात ओलसरपणा बसणार नाही.
फराळ थेट उन्हात किंवा उष्ण जागी ठेवू नका. यामुळे तो लवकर घराब होतो.
फराळाच्या थरांना वेगळे ठेवण्यासाठी सिलिकॉन शीट किंवा वॅक्स पेपर वापरु शकता.
फराळ तयार करताना साखर नीट बारिक करुन पावडर हलक्या हाताने मिक्स करा. त्यामुळे फराळ कोरडा राहतो.
फराळात तेल किंवा तूप खूप जास्त ठेवू नका. अति तेलाने फराळ लवकर नरम होतो.
फराळ स्टोअर करताना त्यावर हलके झाकण ठेवा. पूर्ण सील केल्यास ओलसरपणा वाढतो.
काजू, बदाम व इतर नट्स शेवटी मिक्स करा. अगोदर घालल्यास ते तेल सोडून फराळ नरम होतो.
जर फराळ खूप दिवस टिकवायचा असेल तर थंड जागेत किंवा फ्रिजमध्ये स्टोअर करा.
फराळ हाताने घेताना स्वच्छ आणि कोरडे हात वापरा; ओलसर हाताने स्पर्श केल्यास तो लवकर नरम पडतो. या सोप्या टिप्स फॉलो करा.