Sakshi Sunil Jadhav
आज शनि प्रदोष आहे. विशेष उपासना करणे आज फलदायी ठरेल. धनत्रयोदशीचा दिवस आपल्या शुभता घेऊन येईल आणि आयुष्यात येऊन धनवृद्धी करेल.
प्रेमासाठी पैसा खर्च होईल. घरामध्ये नवीन काही गोष्टी खरेदी होईल. वाहन, घर घेणे यासाठी आजचा दिवस आपल्या राशीला विशेष लाभदायक आहे.
भावंडसौख्य उत्तम राहील. कामानिमित्त जवळचे प्रवास होतील. कामाचा ताण असला आणि वाढला तरी सुद्धा सहजगत्या त्यातून मार्ग काढाल.
कुटुंबीयांचे सोपस्कार करण्यामध्ये दिवस व्यस्त राहील. सणासुदीचे दिवस आहेतच काही जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतील.
एक वेगळ्या प्रकारची लहर आपल्या शरीरामध्ये आज जाणवेल. कामाला पेटून उठाल. आपला इतरांवर प्रभाव राहील.
नको त्या गोष्टींचा आज विचार करून मानसिकता खराब करून घेऊ नये. मोठ्या प्रमाणात पैसा खरेदीसाठी खर्च होईल. मानसिकता सांभाळावी.
मित्र-मैत्रिणींच्या गराड्यामध्ये राहाल. नव्याने ओळखी परिचय करण्यात एक वेगळी मजा येईल. सोचोटीने व्यवहार होतील. तब्येतीची काळजी घ्यावी.
कर्मफल आपल्याबरोबर येते याची जाणीव ठेवावी. सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन नव्याने गोष्टी करण्याची लहर येईल.
भाग्यकारक घटनांचा आजचा दिवस आहे. धनत्रयोदशी आहे. पैशाच्या दृष्टीने भरभराट होईल. ज्या गोष्टी कराल त्यात यश मिळेल.
अचानक धनालाभ होतील. कामाशी निगडित व्यवहार होतील गुप्तधनासाठी दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे. दिवसाच्या शेवट सुखकर होईल.
भागीदारी व्यवसायामध्ये काहीतरी बदल घडण्याची शक्यता आहे. नव्याने काहीतरी संशोधन होईल. कोर्टाच्या कामांमध्ये सहज यश मिळेल.
तब्येतीच्या तक्रारी वाढतील. काळजी घ्यावी. घरातील नोकर यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला आहे. गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल.