Mobile Recharge: खुशखबर! महिन्याचा रिचार्ज प्लान २८ ऐवजी ३० दिवसांचा होणार? राघव चड्ढांच्या मागणीनंतर सरकार मोठं पाऊल उचलणार

Telecom News: २८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमुळे ग्राहकांचा खर्च वाढत असल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित झाला. सरकार आणि TRAI ३० दिवसांच्या प्लॅनसाठी प्रयत्न करत असून यामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळू शकतो.
mobile recharge update
Mobile Rechargegoogle
Published On

सध्या स्मार्टफोन युजर्स प्रत्येक घरात आहेत. मुळात हे युग आता डिजीटल होत चालले आहे. त्यामुळे घरातल्या फॅनपासून ते कारपर्यंतच्या सगळ्याच उपकरणांमध्ये डिजीटलचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या मोबाइलमधून सुद्धा अनेक उपकरणं हॅंडल करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर करावा लागतो. तर तुम्हाला तुमच्या सिमकार्डात दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो. पण आता यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पुढील माहितीत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

मोबाइल युजर्ससाठी एक आंनदाची बातमी समोर आली आहे. देशातल्या टेलिकॉम कंपन्यांच्या 28 दिवसांच्या प्लानमुळे युजर्सना वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो. हा मुद्दा आता गंभीरपणे घेतला पाहिजे. या संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. संसदेत Raghav Chadha यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, 28 दिवसांच्या प्लानमुळे युजर्सचा खर्च वाढतो. कारण हे प्लान प्रत्यक्षात पूर्ण महिन्याचे नसतात. त्यामुळे वर्षातल्या 365 दिवस कव्हर करण्यासाठी एक जास्तीचा रिचार्ज करावा लागतो. याचा सामान्य युजर्सच्या खिशाला कात्रीच लागते.

mobile recharge update
Jio Recharge: खुशखबर! 98 दिवसांची वैधता, दिवसाला 2 जीबी डेटा, Jioच्या या प्लानची किंमत फक्त...

त्यांच्या या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री Jyotiraditya Scindia यांनी स्पष्ट केलं की, सरकार टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांच्या प्लान्स सुरु करायला सांगणार आहे. त्यांनी असंही नमूद केलं की, Telecom Regulatory Authority of India (TRAI) ने आधीच प्रत्येक टेलिकॉम कंपनीला किमान एक 30 दिवसांचा प्लान देणं बंधनकारक केलं आहे.

भारतामध्ये अनेक कंपन्या 28 दिवसांच्या वैधतेचे प्लान देतात, ज्यांना मंथली प्लान म्हणून जाहिरात केली जाते. पण हे प्लान प्रत्यक्षात पूर्ण 30 दिवस चालत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना सतत रिचार्ज करावा लागतो. TRAI ने 2022 मध्ये जाहीर केलेल्या नियमांनुसार, प्रत्येक प्रीपेड प्लान श्रेणीत किमान एक 30 दिवसांचा पर्याय देणं आवश्यक आहे, त्याने ग्राहकांनी संपूर्ण महिन्याचा रिचार्ज प्लान वापरता येईल. तसेच डेटा वापराबाबतही ग्राहकांना नुकसान सहन करावं लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

अनेक रिजार्च प्लानमध्ये रोज मिळणारा डेटा जर पूर्ण वापरला गेला नाही, तर तो मध्यरात्रीनंतर संपतो. म्हणजेच ग्राहकांना पैसे देऊनही उरलेला डेटा वापरता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर भविष्यात 28 दिवसांचे प्लान बंद करून सर्व मंथली प्लान्स 30 दिवसांचे करण्याची मागणी केली गेली. त्यासोबत रिचार्ज संपल्यानंतर किमान एक वर्ष इनकमिंग कॉल आणि मेसेज सेवा सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. TRAI च्या नियमांनुसार, कोणत्याही मोबाईल नंबरला किमान 90 दिवसांपर्यंत बंद करता येत नाही. पण तरीही ग्राहकांना या समस्येला सामोरं जावं लागतं.

mobile recharge update
Blood Pressure: सततच्या टेन्शनमुळे वाढतो BP! तुमची ही सवय लगेच बदला, डॉक्टरांनी दिलाय सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com