National Song India: 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे! स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवणाऱ्या गीताचा गौरवशाली इतिहास

Vande Mataram History: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला आज १५० वर्षे पूर्ण झाली. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं प्रतीक बनलं आणि तिरंग्यावर प्रथम उमटलं.
Vande Mataram History
National Song Indiasaam tv
Published On

१८७५ मध्ये लिहिल्या गेलेल्या राष्ट्रीय गीताला आज १५० वर्षे झाली आहेत. संपूर्ण भारतामध्ये हा दिवस धामधुमीत साजरा केला जातो. पण बऱ्याच भारतीयांना किंवा विद्यार्थ्यांना याचा संपूर्ण इतिहास माहित नसतो. पण पुढे आपण सोप्या पद्धतीने याची माहिती आणि इतिहास जाणून घेणार आहोत.

भारताच्या संविधान निर्मात्यांनी 'वंदे मातरम्' या गीताला तेवढेच मानाचे स्थान दिले आहे, जेवढे राष्ट्रगीत 'जन गण मन' या गिताला मिळाले आहे. 'वंदे मातरम्' या शब्दांनी फक्त लोकांच्या भावना जागृत करण्याचे काम केले नाही. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या प्रवासातही या गीताचा मोठा वाटा राहिला आहे. देशाने जेव्हा पहिल्यांदा स्वतंत्र भारताचे प्रतीक म्हणून ध्वज फडकावला, तेव्हा त्या ध्वजाच्या मधोमध संस्कृतमधील हे दोन शब्द 'वंदे मातरम्' लिहिलेले होते. तो ध्वज अनधिकृत असला तरी देशभक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला गेला.

Vande Mataram History
Chanakya Tips: अपमानाचा बदला कसा घ्याल? चाणक्यांनी सांगितली बेस्ट टेकनिक

भारताच्या संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली. त्या वेळी संविधान सभेचे अध्यक्ष आणि देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जाहीर केले की, 'वंदे मातरम्'चे महत्त्व ‘जन गण मन’इतकेच आहे आणि दोन्हीला समान सन्मान दिला जाईल. या गीताचे निर्मिती महान कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली होती.

Vande Mataram History
Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

साहित्यिक बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत १८७० च्या दशकात बंगालमध्ये पडलेल्या भयानक दुष्काळामुळे आणि इंग्रजांच्या अत्याचारांने संतप्त झालेल्या लोकांमध्ये जन जागृती निर्माण व्हावी यासाठी लिहिले. हे गीत 'आनंदमठ' या कांदबरीचा एक भाग आहे. या गीताचा वापर स्वातंत्र्यलढ्या दरम्यान लोकांना प्रेरणा देण्यासाठी उपयोगी पडले. याच वेळी इंग्रजांनी भारतात त्यांचे 'गॉड सेव्ह द क्वीन' हे गीत गाण्याचा आदेश दिला. या विरोधात ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या दिवशी या महान गीताची रचना करण्यात आली.

'वंदे मातरम्'ची लोकप्रियता वाढत गेली आणि गुलामगिरीच्या काळात पहिल्यांदा भारताचा एक तिरंगा ध्वज तयार झाला. त्यावर हेच दोन शब्द लिहिलेले होते. १९०६ साली कोलकात्यात पारसी बागान स्क्वेअर येथे जेव्हा स्वदेशी आंदोलनाच्या वेळी पहिला तिरंगा फडकावला गेला, तेव्हा त्यावर 'वंदे मातरम्' लिहिलेले होते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Q

‘वंदे मातरम्’ गीत कोणी लिहिले?

A

हे गीत महान साहित्यिक बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

Q

‘वंदे मातरम्’ गीत कधी लिहिले गेले?

A

हे गीत ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या दिवशी लिहिले गेले.

Q

पहिल्यांदा तिरंग्यावर ‘वंदे मातरम्’ कधी लिहिले गेले?

A

१९०६ साली कोलकत्यात पारसी बागान स्क्वेअर येथे फडकवलेल्या तिरंग्यावर हे शब्द लिहिलेले होते.

Q

‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा कधी मिळाला?

A

२४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com