हजारो वर्षांच्या श्रद्धेचा वारसा… प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी… भगवान शंकराच्या सान्निध्याने पुनीत झालेले त्र्यंबकेश्वर आणि कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा अखंड प्रवाह असलेली गोदामाई! अशा पवित्र वातावरणात नाशिकच्या गोदातीरावर श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश घुमला!
सिंहस्थ कुंभपर्व हे केवळ धार्मिक आयोजन नसून भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा उत्सव आहे. या श्रद्धेच्या महासंगमाला पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि आधुनिकतेची जोड देऊन आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील ६५० गावांमधील सुमारे ६ हजार ५०० जनजाती बांधव सहभागी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी विशेष आनंद व्यक्त केला. हा सहभाग भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी देशवासीयांना पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले. नद्या, जलस्रोत आणि नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्याबरोबरच स्वच्छता आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. श्रद्धेसोबत पर्यावरणाविषयीची जबाबदारीही प्रत्येकाने जपावी, असा संदेश त्यांनी दिला.
अध्यात्मासोबत सामाजिक एकात्मता, परंपरेसोबत आधुनिकता आणि श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम आगामी सिंहस्थ कुंभपर्वातून घडेल, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२७ साठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील विकासकामे प्रत्यक्षात साकारत आहेत. शासनाची भूमीका सुविधा निर्माण करण्याची असून या कुंभपर्वाचे खरे मालक साधू-महंत आहेत. शासन-प्रशासनाकडून काही चूक झाली, तर संत-महंतांनी मोठ्या मनाने क्षमा करावी,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.