
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व असते. हे सण केवळ धार्मिक पूजेसाठी नाहीतर तर उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी सुद्धा साजरा केले जातात. श्रावणात नवविवाहात महिलांचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. यादिवशी घरात देवीची पूजा करून पारंपरिक खेळ खेळले जातात. फुगड्या, भोंडला इतर नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला जातो. याशिवाय नवविवाहित महिला सुंदर सुंदर उखाणे घेतात. पण कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा उखाणे पाठ वाचायला किंवा पाठ करायला जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे आम्ही गंमतीशीर आणि सोपे उखाणे येथे देत आहोत.
सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी
…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,
…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट
सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे
….. रावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे
जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले
…रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले
सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास
आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन…
रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन
मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी,
….रावांमुळे मला मिळाली जीवनाची अवीट गोडी
सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह
मंगळागौरी माते, नमन करते तुला
….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला
मंगळागौरीला पुजल्या आहेत सोळा पत्री
…रावांची मी आहे कुशल गृहमंत्री
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.