तुम्हाला पिवळे रेशन कार्ड काढायचे आहे? जाणून घ्या प्रोसेस अन् पात्रता?

Yellow Ration Card Apply: महाराष्ट्र राज्यात महत्त्वाच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड आवश्यक  आहे. सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळते. ओळखीचा  पुरावा म्हणून रेशन कार्ड उपयोगी पडते.
Yellow Ration Card Apply:
saam tv
Published on

रेशन कार्डसाठी अटी काय?

पिवळे रेशन कार्ड मिळवण्यासाठी काही ठराविक अटी आणि नियम आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांना हे  रेशन कार्ड दिले जाते.

उत्पन्न किती असावं?

अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ हजारांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन नसावे.   २ हेक्टरपेक्षा जास्त बागायती जमीन नसली पाहिजे.

कोणती कागदपत्रं लागतात?

- आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, वीज बिल, पाणी बिल किंवा भाडे करार, तहसीलदारांनी दिलेला त्यावर १५ हजार किंवा त्याखालील उत्पन्न असलेला दाखला,  तसेच कुटुंबातील प्रमुखाचा फोटो तसेच जुने रेशन कार्ड असेल तर नाव कमी केल्याचा दाखला, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत हवी.

ऑनलाईन प्रोसेस-अर्ज कसा करायचा?

'आपले सरकार' (MahaOnline) पोर्टलवरून तुम्ही स्वतः अर्ज करू शकता. आधी aaplesarkar.mahaonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. , New User? Register Here' वर क्लिक करा. तेथे युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.

तुमच्या आयडीने लॉग-इन करा

आणि डॅशबोर्डवर 'Food & Civil Supplies Department' (अन्न व नागरी पुरवठा विभाग) निवडा. उपलब्ध सेवांपैकी 'New Ration Card' किंवा 'Application for New Ration Card' हा पर्याय निवडा .

कुटुंबातील सदस्यांची माहिती

आता  एक अर्ज उघडेल. त्यात कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, वय, आधार नंबर आणि उत्पन्नाची माहिती अचूक भरावी. वरील यादीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करून टाका.

शुल्क भरा

अर्जाचे नाममात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा. अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक 'ॲप्लिकेशन नंबर' मिळेल, तो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com