Rakhi Muhurat 2026 : रक्षाबंधनाला राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती? ‘या’ 3 तासांत राहूकाळाचं सावट; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केले जाईल. यंदा भद्रेचे सावट नसून, सकाळी ६:२३ ते ९:४८ या ३ तास २५ मिनिटांत राखी बांधणं शुभ मानलं जातं.
Rakhi Muhurat 2026
Rakhi Muhurat 2026 meta ai
Published On

रक्षाबंधन हा भाऊ- बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण मानला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखी आयुष्याची प्रार्थना करते. तसंच भाऊही बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता, भद्राकाळ आहे का, याकडे अनेकांचं लक्ष असतं.

यंदा रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केलं जाईल. पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथीची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी होईल, तर पौर्णिमा तिथीची समाप्ती ही २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ४८ मिनिटांनी होईल. उदयतिथीनुसार रक्षाबंधन २८ ऑगस्टला साजरा केले जाईल.

Rakhi Muhurat 2026
FD Rules 2026 : FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून RBI चा नवा नियम; फायदा की तोटा होणार?

भद्राचे सावट आहे का?

रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असेल तर राखी बांधणं टाळावं, अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र यंदा भांवडांना याची काळजी करण्याची गरज नाही. पंचांगानुसार भद्राकाळ २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून आठ मिनिटांपासून ते ९.३२ पर्यंत या कालावधीत असेल. म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राचे सावट राहणार नाही.

Rakhi Muhurat 2026
Railway Luggage Booking : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता घरबसल्या बुक करा Extra Luggage; भाडे किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

ज्योतिषीय माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२३ ते ९.४८ या वेळेत राखी बांधणं शुभ मानलं जाणार आहे. हा मुहूर्त एकूण ३ तास २५ मिनिटांचा आहे. त्यामुळे शक्य असेल तर सकाळच्या वेळेतच भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करा. सकाळी शक्य नसेल तर दुपारच्या अभिजीत मुहूर्तातही राखी बांधता येऊ शकते.

तसेच, यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणही होणार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही, अशी माहिती आहे.

डिस्क्लेमर: हा लेख धार्मिक आणि पंचांगातील माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. मुहूर्ताबाबत स्थानिक पंचांग किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com