Railway Luggage Booking : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता घरबसल्या बुक करा Extra Luggage; भाडे किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Railways New Luggage Facility: भारतीय रेल्वेने कन्फर्म तिकीटधारकांसाठी ऑनलाइन लगेच बुकींग सुविधा सुरू केली आहे. घरबसल्या अतिरिक्त सामानाची माहिती भरून भाडं जाणून घेता येईल आणि स्टेशनवर पडताळणीनंतर सामान बुक करता येईल.
Indian Railways New Luggage Facility
Railway Luggage Bookingmeta ai
Published On

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. आता कन्फर्म रेल्वे तिकीट असलेल्या प्रवाशांना अतिरिक्त सामानाचे (Extra Luggage) ऑनलाइन डिक्लेरेशन आणि बुकींग करता येणार आहे. त्यामुळे सामान बुक करण्यासाठी रेल्वेच्या पार्सल कार्यालयात रांगेत उभं राहण्याची गरज कमी होणार आहे. ही ऑनलाइन सुविधा ३१ जुलैपासून सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

ऑनलाइन लगेज बुकिंगची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ऑनलाइन लगेज बुक करण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत पार्सल वेबसाइटवर जा. त्यानंतर खालील प्रोसेस फॉलो करा.

१. parcel.indianrail.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.

२. आता ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख आणि गंतव्य स्थानकाची माहिती भरा.

३. सामानाची आवश्यक माहिती आणि वजनाची माहिती द्या.

४. माहिती भरल्यानंतर पोर्टलवर अंदाजित लगेच भाडे दिसेल. पुढे ऑनलाइन अर्जाची प्रिंट घेऊन सामानासह स्थानकावर जा.

५. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सामानाचे वजन आणि अंतिम पडताळणी केली जाईल.

६. शुल्क भरल्यानंतर मिळालेली पावती जपून ठेवा. तिथे स्थानकावर पावती दाखवून सामान ताब्यात घेता येईल.

Indian Railways New Luggage Facility
PM Kisan Yojana: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 येणार? नेमकं सत्य काय?

या सुविधेमुळे प्रवाशांना सामानाचे ट्रॅक अँड ट्रेस करता येणार असून, SMS च्या मदतीने सामानाच्या स्थितीची माहिती मिळण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

Indian Railways New Luggage Facility
8th Pay Commission : 8वा वेतन आयोग लागू होताच जुन्या पेन्शनधारकांचीही लागणार लॉटरी? पेन्शनबाबत मोठी अपडेट

कोणत्या क्लासमध्ये किती सामान नेता येतं?

रेल्वेने वेगवेगळ्या श्रेणींसाठी मोफत आणि कमाल सामान मर्यादा निश्चित केली आहे. जनरल/ सेकंड क्लासमध्ये ३५ किलो मोफत, तर अतिरिक्त शुल्कासह कमाल ७० किलो सामान नेता येते. स्लीपरमध्ये ४० किलो मोफत आणि ८० किलो कमाल मर्यादा आहे.

फर्स्ट एसीमध्ये ७० किलो मोफत आणि १५० किलोपर्यंत, तर सेकंड एसीमध्ये ५० किलो मोफत आणि १०० किलोपर्यंत सामान नेता येतं. एसी-३ टियर आणि एसी चेअर कारसाठी ४० किलो मोफत मर्यादा आहे.

अतिरिक्त सामानासाठी किती शुल्क?

तुमच्याकडे जास्त लगेजसाठी स्टॅडर्ड रेटच्या १.५ पट शुल्क आकारलं जाईल. किमान शुल्क ३० रुपये असून, वजनाची गणना १० किलोच्या स्लॅबमध्ये केली जाते. शुल्काच्या गणनेसाठी किमान ५० किलोमीटर अंतराचा नियम लागू आहे. ही सुविधा फक्त कन्फर्म तिकीटधारक प्रवाशांसाठी असल्याने बुकिंग करण्याआधी तिकीटाती स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com