Rahu Gochar
Rahu Gochar In Meensaam tv

Rahu Gochar 2026: राहूच्या गोचरमुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; प्रत्येक कामातून हाती येणार पैसा

Zodiac signs benefit from Rahu transit: भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा एक मायावी ग्रह मानला जातो, जो आपले फळ अचानक आणि अनपेक्षितपणे देतो. राहूचे गोचर म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे, हे नेहमीच महत्त्वाचे मानले जाते
Published on

२०२६ साली राहू शनीच्या राशीत संचार करणार आहे. संपूर्ण वर्षभर राहू ग्रहाचा प्रभाव सर्व राशींवर जाणवणार आहे. ११ महिने राहू कुंभ राशीत राहिल्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही राशींचे स्वामित्व शनीकडे असल्यामुळे राहूचा संचार शनीच्या प्रभावाखालीच राहणार आहे.

राहू सध्या कुंभ राशीत आहे. १८ मे २०२५ रोजी राहूने कुंभ राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर आणि तो ५ डिसेंबर २०२६ पर्यंत याच राशीत राहणार आहे. राहू हा मायावी ग्रह उलट चालतो, त्यामुळे २०२६ मध्ये तो कुंभमधून मागील राशी म्हणजेच मकरमध्ये प्रवेश करणार आहे. मकर आणि कुंभ या दोन्ही राशी शनीच्या अधीन आहेत, त्यामुळे राहूचा संचार शनीच्या प्रभावाखालीच राहणार आहे. राहूच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

Rahu Gochar
Guru-Shani transit: 500 वर्षांनंतर श्रावणात बनणार शनी-गुरुचा दुर्लभ संयोग; 'या' 3 राशींचे येणार अच्छे दिन

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी राहूचा शनीच्या राशीत संचार अत्यंत लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली पदोन्नती आणि प्रगती मिळू शकणार आहे. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे योग येणार आहेत. व्यवसायात नफा मिळवण्याचे अनेक संधी मिळतील.

Rahu Gochar
September Grah Gochar: सप्टेंबरमध्ये बुध, मंगल आणि शुक्र ग्रह बदलणार चाल; 'या' 3 राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी राहू शुभ फल देऊ शकतो. विशेषतः पालकांना मुलांकडून आनंद मिळेल. सिंगल व्यक्तींना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्ही तुमचे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी व्हाल.

Rahu Gochar
Chandra Gochar 2025: भाऊबिजेच्या दिवशी चंद्राचं होणार गोचर; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com